'वांगी' हा भाजीचा असा प्रकार आहे की अनेकजण आवडत नाही म्हणून नाकं मुरडतात. वांग्याची भाजी ताटात वाढलेली बघून आपल्याला जेवण नकोसे वाटते. वांग्यातील त्या लहान - लहान बिया असो किंवा अगदीच मऊ लगदा झालेल्या वांग्याचा फोडी असो, यांसारख्या अनेक कारणांनी आपल्याला वांगे खाणे आवडत नाही. याउलट जर आपल्याला चमचमीत वांग्याचे काप, चटपटीत वांग्याचे भरीत, दही - दाण्याचा कूट घालून केलेले वांग्याचे भरीत असे काही मस्त चमचमीत पदार्थ दिले तर आपण सगळेच आवडीने खातो(Brinjal Rice Recipe).
दररोज खाण्यात काहीतरी वेगळं असावं, असा प्रत्येकाचा अट्टहास असतो पण नेमकं काय करावं, हेच कळत नाही. भात म्हटले की आपण मसाले भात, दाल खिचडी किंवा पुलाव शिवाय काही वेगळं करत नाही. अनेकजणांना वांग्याची भाजी खायला आवडत नाही. परंतु तेच वांग वापरून भरलेली वांगी, वांग्याचे काप केले तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. याच काळ्याभोर मऊ, लुसलुशीत वांग्यापासून तयार होणाऱ्या खमंग, चमचमीत वांगी भाताचा आस्वाद घेऊ शकता. ज्या लोकांना भात खायला आवडतो त्यांनी हा वांगी भात (How to make vangi bhath) नक्की ट्राय करावा हा वांगी भात कसा बनवायचा त्याची सोपी रेसिपी पाहूयात(Vangi Bath, Maharashtrian Style Baingan Rice).
साहित्य :-
१. जिरे - १ टेबलस्पून
२. धणे - १ टेबलस्पून
३. ओल्या खोबऱ्याचे लहान तुकडे - ३ टेबलस्पून
४. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
५. दालचिनी - १ काडी
६. काळीमिरी - १० ते १२ दाणे
७. आल्याच्या छोटा तुकडा - २ इंचाचा तुकडा
८. लसूण पाकळ्या - ४ ते ५ पाकळ्या
९. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
१०. मोहरी - १ टेबलस्पून
११. कडीपत्ता - ५ ते ६ पाने
१२. शेंगदाणे - १ टेबलस्पून
१३. चण्याची डाळ - १ टेबलस्पून
१४. काळे चणे - २ टेबलस्पून (उकडवून घेतलेले)
१५. मीठ - चवीनुसार
१६. हिंग - चिमूटभर
१७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१८. वांग्याचे तुकडे - १ बाऊल (उभे तुकडे करून घेतलेले)
१९. भात - २ कप (शिजवून घेतलेला)
२०. कोथिंबीर - १ टेबलस्पून ( बारीक चिरुन घेतलेली)
२१. साजूक तूप - १ टेबलस्पून
भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...
कृती :-
१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये जिरे, धणे, ओल्या खोबऱ्याचे लहान तुकडे, लाल सुक्या मिरच्या, दालचिनी, काळीमिरी, आल्याच्या छोटा तुकडा, लसूण पाकळ्या घालून हे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत.
२. हे जिन्नस भाजून घेतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत, थंड झाल्यावर हे जिन्नस मिक्सरला वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी.
३. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, कडीपत्ता, शेंगदाणे, चण्याची डाळ, उकडवून घेतलेले काळे चणे, चवीनुसार मीठ, हिंग, लाल तिखट मसाला घालावा.
अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...
मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...
४. त्यानंतर यात आपण मिक्सरमध्ये वाटून बारीक केलेला मसाला घालावा. हे सगळे जिन्नस तेलात परतून घ्यावेत.
५. आता यात वांग्याचे लहान तुकडे घालून थोडासा पाण्याचा शिडकावा करून ३ ते ५ मिनिटे सगळे शिजू द्यावेत.
६. सगळ्यात शेवटी यात तयार शिजवून घेतलेला भात घालावा. भात व तयार मसाला ढवळून व्यवस्थित एकजीव करून घ्यावा.
७. सगळ्यात शेवटी सर्व्ह करताना हा वांगी भात वाढून त्यावरून आपल्या आवडीप्रमाणे साजूक तुपाची धार सोडून, कोथिंबीर भुरभुरवून खाण्यासाठी सर्व्ह करावा.
वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...
आपला चविष्ट, खमंग वांगी भात खाण्यासाठी तयार आहे.