Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटांत करा वांग्याचे काप, कुरकुरीत-खमंग आणि पौष्टिक-पावसाळ्यात वाढवतात भूक

फक्त १० मिनिटांत करा वांग्याचे काप, कुरकुरीत-खमंग आणि पौष्टिक-पावसाळ्यात वाढवतात भूक

Vangyache Kaap / Pan Fried Crispy Eggplant : भरीत - भरली वांगी खाऊन कंटाळा आला असेल तर, कुरकुरीत वांग्याचे काप करून खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 05:30 PM2024-06-25T17:30:29+5:302024-06-25T17:31:24+5:30

Vangyache Kaap / Pan Fried Crispy Eggplant : भरीत - भरली वांगी खाऊन कंटाळा आला असेल तर, कुरकुरीत वांग्याचे काप करून खा..

Vangyache Kaap / Pan Fried Crispy Eggplant | फक्त १० मिनिटांत करा वांग्याचे काप, कुरकुरीत-खमंग आणि पौष्टिक-पावसाळ्यात वाढवतात भूक

फक्त १० मिनिटांत करा वांग्याचे काप, कुरकुरीत-खमंग आणि पौष्टिक-पावसाळ्यात वाढवतात भूक

वांग्याचे पदार्थ प्रत्येकाला आवडतीलच असे नाही (Vangyache kaap). वांग्याचे अनेक पदार्थ केले जातात. काही जण आवडीने खातात. तर काही जण वांगी खाणं टाळतात. वांग्याची भाजी, भरली वांगी, वांग्याचं भरीत आणि वांग्याची भजी आपण खाल्लीच असेल (Eggplant Recipe). पण बहुतांश घरात वांग्याचे काप जास्त प्रमाणात बनवतात (Cooking Tips).

वांग्याचे काप करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. किंवा जास्त साहित्यांची देखील गरज भासत नाही. पण बऱ्याचदा मनासारखे वांग्याचे काप तयार होत नाही. जर आपल्याला या पावसाळ्यात परफेक्ट कुरकुरीत वांग्याचे काप करायचे असतील तर, या रेसिपीला फॉलो करा. कमी साहित्यात कुरकुरीत चविष्ट वांग्याचे काप तयार होतील. वरण - भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे(Vangyache Kaap / Pan Fried Crispy Eggplant).

वांग्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य

वांगी

लाल तिखट

धणे पूड

केस मुळापासून काळे करणारे ३ घरगुती उपाय- केस होतील दाट-दिसतील सिल्की आणि चमकदार

गरम मसाला

मीठ

कोथिंबीर

लिंबाचा रस

रवा

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये दोन चमचे लाल तिखट, एक चमचा धणे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

आता आकाराने मोठं वांगं स्वच्छ धुवून घ्या आणि गोलाकार चकत्या कापून घ्या. त्यावर चवीनुसार मीठ आणि तयार मसाला पसरवून कोट करा. त्यावर लिंबाचा रस लावा, जेणेकरून काप चवीला चटपटीत होतील.

पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेलं? ३ उपाय पाणी निघेल- कानाची ‘अशी’ घ्या काळजी

एका प्लेटमध्ये एक कप रवा घ्या. त्यात तयार उरलेला मसाला घालून मिक्स करा. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक चमचा तेल ओतून पसरवा. रव्याच्या मिश्रणात वांग्याचे काप ठेवून कोट करा, व तव्यावर ठेवून खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे झटपट कुरकुरीत वांग्याचे काप खाण्यासाठी रेडी.

Web Title: Vangyache Kaap / Pan Fried Crispy Eggplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.