Lokmat Sakhi >Food > वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

Vangyachi Bharit | Baingan Bharta from Maharashtra वांग्याचं भरीत चविष्ट लागतंच, पण गावरान पद्धतीने केलेलं भरीत जास्त मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 01:28 PM2023-03-28T13:28:09+5:302023-03-28T13:29:01+5:30

Vangyachi Bharit | Baingan Bharta from Maharashtra वांग्याचं भरीत चविष्ट लागतंच, पण गावरान पद्धतीने केलेलं भरीत जास्त मस्त

Vangyachi Bharit | Baingan Bharta from Maharashtra | वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

प्रत्येक ऋतूत वांगे बाजारात मिळतात. वांग्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. वांग्याची भाजी, वांग्याची आमटी, भरलं वांगे, वांग्याचे काप याव्यतिरिक्त, वांग्याचे भरीत हा पदार्थ आवडीने खातात. वांग्याचे भरीत महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतात देखील फेमस आहे. वांग्याचे भरीत बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कच्चे भरीत, खान्देशी वांग्याचे भरीत, पंजाबी वांग्याचे भरीत, लाहोरी वांग्याचे भरीत, बनारसमध्ये प्रसिद्ध असलेला लिट्टी चोखामध्ये चोखा म्हणजे वांग्याचं किवा बटाट्याच कच्च भरीत.

वांगी चवीला असली की त्याचे पदार्थ फार उत्कृष्ट लागतात. गरम गरम चुलीवरचं भरीत यासह टम्म फुगलेली भाकरी म्हणजे स्वर्गच. शहरात चूल असणं जरा अवघडच आहे. पण आपण शेगडीवर देखील वांग्याचं भरीत बनवू शकता(Vangyachi Bharit | Baingan Bharta from Maharashtra).

चमचमीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ वांगं 

बारीक चिरलेला कांदा 

बारीक चिरलेली हिरवी मिरची

आलं - लसणाचा ठेचा

घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट

मीठ 

शेंगदाण्याचं कूट 

गरम मसाला 

धणे पूड 

कडीपत्ता 

जिरं 

मोहरी 

हळद 

कोथिंबीर 

तेल

अशा पद्धतीने बनवा वांग्याचे भरीत

सर्वप्रथम, वांगं स्वच्छ धुवून पुसून घ्या, त्यानंतर सुरीने त्यावर छेद द्या. आता थोडं तेल घेऊन वांग्याला ग्रीस करा. वांग्याला तेलाने ग्रीस केल्यानंतर गॅसवर ठेऊन सगळ्या बाजूने भाजून घ्या. वांगं भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. मग त्यावरून भाजलेली वांग्याचे साल काढून घ्या. व चमच्याच्या मदतीने वांग्याला मॅश करा.

वर्षभर उत्तम टिकणाऱ्या बटाटा किसाची परफेक्ट पारंपरिक कृती, पाहा बटाटा नेमका कसा निवडायचा..

फोडणीसाठी कढई गरम करा व तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, घालून संपूर्ण मिश्रणाला मध्यम आचेवर ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या. कांद्याला हलका सोनेरी रंग आल्यानंतर त्यात आलं - लसणाचा ठेचा, गरम मसाला, हळद, धणे पूड घालून मिश्रण मिक्स करा.

मिश्रण परतल्यानंतर त्यात मॅश केलेलं वांगं घालून मिक्स करा. व त्यात शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिश्रण मिक्स करा. आता लो फ्लेमवर ३ मिनिटे भरीत शिजवण्यासाठी ठेवा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे वांग्याचं भरीत खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Vangyachi Bharit | Baingan Bharta from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.