Join us

कुकरमध्ये १० मिनिटांत करा वाटाणा-बटाट्याची भाजी; सोपी चमचमीत रेसिपी-चव एकदम भन्नाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:30 IST

Vatana Batatyachi Bhaji Recipe : वेगळ्या पद्धतीनं वाटाणा बटाट्याची भाजी केली तर सगळेजण आवडीने खातील.

जेवणाला काय भाजी करावी हा घराघरांतील महिलांना पडणारा कॉमन प्रश्न आहे.  भेंडी, गवार, बटाटा, पालक, मेथी अशा भाज्या सतत रिपिट होत असल्यामुळे खायला नको वाटतात.  (Vatana Batata  Kashi Karaychi) बटाटा हा सर्वांच्याच घरी असतो.  (Cooking Hacks) पिवळी बटाट्याची भाजी, रस्सा भाजी  किंवा बटाट्याचे काप तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण वेगळ्या पद्धतीनं वाटाणा बटाट्याची भाजी केली तर सगळेजण आवडीने खातील. (Vatana Batata Bhaji Recipe) ही युनिक रेसिपी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल.

१) वाटाणा बटाट्याची भाजी बनवण्याासाठी सगळ्यात आधी चार कांदे सालं काढून व्यवस्थित चिरून घ्या. कांदे चिरताना लांब फोडी ठेवा. त्यानंतर ३ ते ४ टोमॅटो चिरून घ्या.  टोमॅटोचे वरचे टोक काढून लांब चिरून घ्या. त्यानंतर आलं किसून घ्या.  बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करा, जास्त लहान भाग करू नका, सोललेले लसूण घ्या.

उरलेल्या भाताचे १० मिनिटांत करा खमंग मेदूवडे; झटपट बनतील कुरकुरीत वडे, पाहा सोपी रेसिपी

२) सगळ्यात आधी कुकरमध्ये तुम्ही वापरत असलेले कोणतंही तेल घाला.  फार कमी तेल घालू नका अन्यथा भाजी जळण्याची शक्यता असते. तेल गरम झाल्यानंतर त्यात  २ ते ३ सुक्या लाल मिरच्या, जीरं घालून फोडणी तयार करून घ्या. त्यात अख्खे सोललेले लसूण, बटाट्याचे काप,  टोमॅटो आणि किसलेलं आलं घाला. 

३) त्यानंतर त्यात वाटाणे घाला. त्यानंतर हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला.  त्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्या.  त्यानंतर कुकरचं झाकण लावा.  झाकण लावण्याआधी तुम्ही यात थोडं पाणी घालू शकता. 

४) भाजी जळणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. हाय फ्लेमवर ३ शिट्ट्या येईपर्यंत भाज्या शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि वाफ काढून कुकरचं झाकण उघडा. त्यानंतर टोमॅटोची सालं व्यवस्थित काढून घ्या. गॅस सुरू करून भाजी पुन्हा शिजवून घ्या. त्यात फ्लेवर येण्याासाठी हिरवी मिरची आणि गरम मसाला घाला. ५ ते ६ मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर पाणी आटेल आणि भाजीवर तेल दिसायला सुरूवात होईल. 

पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

५) त्यानंतर फक्त १ चमचाभर दही आणि कसुरी मेथी घाला. नंतर तुम्हाला जितकं हवं असेल तर तितकं पाणी भाजीत घाला आणि  2 ते ३ मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्या. तयार आहे गरमागरम वाटाणा-बटाट्याची भाजी ही भाजी चपाती, भाकरी, पुलाव, जीरा राईस किंवा साध्या भाताबरोबरही  खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स