Lokmat Sakhi >Food > रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटात करा गरमागरम व्हेज मसाला पुलाव; सोपी, रंगतदार रेसिपी

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटात करा गरमागरम व्हेज मसाला पुलाव; सोपी, रंगतदार रेसिपी

Veg Masala Pulao Quick, Easy Recipe : साधा वरण भात किंवा खिचडी करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही हा पुलाव तयार बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 03:42 PM2023-01-15T15:42:46+5:302023-01-15T15:54:03+5:30

Veg Masala Pulao Quick, Easy Recipe : साधा वरण भात किंवा खिचडी करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही हा पुलाव तयार बनवू शकता.

Veg Masala Pulao Quick, Easy Recipe : How to make masala pulao | रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटात करा गरमागरम व्हेज मसाला पुलाव; सोपी, रंगतदार रेसिपी

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटात करा गरमागरम व्हेज मसाला पुलाव; सोपी, रंगतदार रेसिपी

संक्रांतीच्या दिवशी अनेकांच्या घरी गुळपोळी, पुरणपोळी, तिळाच्या वड्या, तिळ लाडू शेंगदणा बर्फी असे पदार्थ बनवले जातात. गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी मसालेदार चटपटीत खाण्याची इच्छा होते. (Cooking Hakcs & Tips)  रात्रीच्या जेवणासाठी काही गोड न बनवता तुम्ही व्हेज मसाला पुलाव बनवू शकता. (Tawa Pulao Recipe)  साधा वरण भात किंवा खिचडी करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही हा पुलाव तयार बनवू शकता.  जेवणासाठी रायत्याबरोबर पुलाव, पापडचा मेन्यू ठरवाल तर घरातील मंडळीही खूश होतील. पुलावची सोपी रेसिपी पाहूया (How to make tawa pulao)

1) 1 कप तांदूळ मीठ आणि हळद पावडर टाकून 2 टीस्पून तेल घालून एक ते दीड कप पाण्यात शिजवा आणि नंतर थंड करा.

2) लसूण चटणीसाठी 12-15 भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या,  100 ग्रॅम लसूण,  5-6 हिरव्या मिरच्या घाला (पेस्ट बनवा)

3) तवा गरम करून त्यात तेल, 1 टीस्पून बटर, थोडे जिरे (1.5 टीस्पून) घालून शिजवून घ्या, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाज्या घाला.

4) कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, पनीर, सोयाबीन इत्यादी भाज्या बरोबर शिजवून घ्या आणि त्यात थोडा पावभाजी मसाला, मीठ आणि लसूण चटणी त्यात शिजवलेला भात, थोडा लिंबाचा रस, हिरवी कोथिंबीर आणि 2-3 चमचे कसुरी मेथी घालून शिजवा. हा पुलाव रायता किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा. 

Web Title: Veg Masala Pulao Quick, Easy Recipe : How to make masala pulao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.