अनकेदा लहान मुलं भाजी खाताना नाकं मुरडतात. भाजी वेचून काढून त्यातील ग्रेव्ही खातात. ज्यामुळे भाज्यांमधील पौष्टीक घटक मुलांना मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शरीरात आरोग्याच्या निगडीत विविध समस्या उद्भवतात. मुलांसह काही लोकं भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. जर आपल्या घरात देखील भाजी खाण्यास कंटाळा करीत असतील, तर आपण भाज्यांना तंदुरीचा तडका देऊन वेज तंदुर पुलाव, ही हटके रेसिपी बनवू शकता.
वेज तंदुरी पुलाव हा पदार्थ चवीला उत्कृष्ट व झटपट बनतो, त्यामधील भाजी लोकं आवडीने खातील. हा जबरदस्त पुलाव आपण एकदा खाल्लात तर, नक्कीच पुन्हा बनवाल. चला तर मग या हटके रेसिपीची कृती पाहूयात(Veg Tandoori Pulao Recipe: This Smoky, Spicy Pulao Will Be Ready in quick).
वेज तंदुरी पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटा
कांदा
गाजर
सोया चंक्स
ढोबळी मिरची
२ कप दही
लाल तिखट
धणे पूड
गरम मसाला
चाट मसाला
तांदूळ
मीठ
काळी मिरी
तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी
असा बनवा चविष्ट वेज तंदुरी पुलाव
सर्वपथम, तांदूळ धुवून घ्या, त्यात पाणी घालून थोड्या वेळासाठी ठेवा. दुसरीकडे, सगळ्या भाज्यांचे काप करून घ्या. आता एका वाटीत दही घ्या, त्यात लाल तिखट, मीठ, काळी मिरी पूड, गरम मसाला, धणे पूड, व चाट मसाला घाला. आता हे मिश्रण संपूर्ण मिक्स करा, या मिश्रणात बारीक काप केलेल्या भाज्या घालून मिक्स करा. आता भिजवलेले तांदूळ शिजवून घ्या.
रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?
एका कढईत तूप किंवा तेल घालून गरम करा, त्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या घाला, व त्यांना स्टीर फ्राय करा. भाज्या शिजल्यानंतर त्यात शिजलेला भात घालून मिक्स करा. अशा प्रकारे वेज तंदुरी पुलाव खाण्यासाठी रेडी. आपण हा पदार्थ दही अथवा हिरवी चटणीसह खाऊ शकता.