Join us  

शेवयांची खीर नेहमीचीच, दिवाळीत करा शेवयांचे थंडगार कस्टर्ड ! पाडवा आणि भाऊबीज करा स्पेशल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 10:00 AM

Vermicelli Custard Recipe: A Tasty Indian Dessert : यंदाच्या दिवाळीत तीच ती शेवयांची खीर नको, बनवा झटपट गोड - थंडगार शेवया कस्टर्ड, जोडीदार आणि भावाचे तोंड गोड करा....

दिवाळी या पाच दिवसांच्या सणानिमित्त अनेक प्रकारचे विशिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यात गोड पदार्थांचा देखील समावेश असतो. लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खीर (Vermicelli Fruit Custard - Semiya Custard) हा गोड पदार्थ प्रचंड आवडतो. मग ती तांदळाची असो, गव्हाची या बदामाची किंवा शेवयांची. खीर हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खातेच. दिवाळी सण म्हटला की गोडधोड पदार्थांची कायम रेलचेल सुरूच असते. दिवाळीनिमित्त गुलाबजाम, रसगुल्ला, खीर, जिलेबी  यासारखे पदार्थ हे आपण आवर्जून खातोच(Vermicelli Custard Recipe).

दिवाळीनिमित्त येणाऱ्या पाडवा आणि भाऊबीज या सणाला हमखास गोड पदार्थांचा खास बेत आखला जातो. या सणांना मस्त पंचपक्वानांचे जेवण प्रत्येक घरात बनवले जातेच. असे छान साग्रसंगीत जेवण झाल्यावर आपल्याला काहीतरी गोड, थंडगार खाण्याचा मोह होतोच. अशावेळी आपण आईस्क्रिम, फालुदा, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टर्ड जेवणानंतर गोड खाणे म्हणून पसंत करतो. परंतु नेहमीचेच तेच ते गोड पदार्थ खाण्यापेक्षा आपण शेवयांचे छान, थंडगार, गोड कस्टर्ड (Shevaya Custard Recipe) घरच्या घरी बनवू शकतो. शेवयांचा उपमा, शेवयांची खीर असे शेवयांपासून बनवलेले पदार्थ आपण नेहमीच खातो. याच शेवयांचा वापर करून आपण त्यापासून छान गोड शेवया कस्टर्ड बनवू शकतो. यंदाच्या पाडवा व भाऊबीजेला (Sevai Fruit Custard) नक्की करावी अशी शेवया कस्टर्डची सोपी रेसिपी( Vermicelli custard recipe with custard powder).     

साहित्य :- 

१. साजूक तूप - १ टेबलस्पून२. शेवया - १ + १/२ कप३. दूध - २ कप ४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ५. कस्टर्ड पावडर - २ टेबलस्पून (व्हॅनिला फ्लेव्हर्ड)६. केशर - १० ते १२ काड्या ७. साखर - १/४ कप ८. काजू - बदामाचे काप - २ ते ३ टेबलस्पून ९. डाळिंबाचे दाणे - २ ते ३ टेबलस्पून १०. केळीचे काप - ३ ते ४ कप ११. अ‍ॅप्पलचे तुकडे - २ ते ३ टेबलस्पून

चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात या शेवया खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्याव्यात. २. एका वेगळ्या भांड्यात दूध घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा, दूध उकळल्यानंतर त्यात केशर, वेलची पूड, व साजूक तुपात परतून घेतलेल्या शेवया घालून घ्याव्यात. ३. ५ ते ७ मिनिटांनंतर या शेवया दुधात फुलून येतील त्यानंतर त्यात साखर, काजू - बदामाचे काप घालावेत. ४. आता एका बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन ती दुधात व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. 

कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

५. त्यानंतर शेवयांच्या तयार मिश्रणात ही दुधात मिसळून घेतलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून घ्यावी. ६. आता हे मिश्रण चमच्याने सारखे ढवळत राहावे, त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. ७. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे मिश्रण किंचित घट्ट होऊ लागेल. ते व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यावे. ८. त्यानंतर हे कस्टर्ड तयार झाल्यावर थंड होण्यासाठी ठेवावे. ९. कस्टर्ड सर्व्ह करताना एक ग्लास घेऊन त्यात आधी चमचाभर डाळिंबाचे दाणे, केळीचे काप घालावेत मग त्यावर एक थर शेवयांचा लावावा. त्यानंतर पुन्हा डाळिंबाचे दाणे, अ‍ॅप्पलचे तुकडे घालून मग परत त्यावर एक थर शेवयांचा लावावा. (आपण आपल्या आवडीच्या फळांचे लहान तुकडे देखील वापरु शकता.)

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

अशाप्रकारे शेवयांचे कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृती