विकी कौशल आणि कतरिना यांच्या लग्नाला महिना झाला. त्यांच्या वन मंथ वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा होत असली तरी . आता सर्वांचं लक्ष विकी कौशलच्या आगामी चित्रपटावर आहे. विकी कौशल याचे आगामी चित्रपट , त्यासाठी तो घेत असलेली मेहनत याच्या बातम्या सतत वाचायला मिळत आहेत. विकी कौशल त्याच्या भूमिकेसाठी स्वत:वर खूप काम करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मूळ विकी कौशल आणि विशिष्ट चित्रपटातला विकी कौशल याच्यातला फरक जाणवतोच. याचं कारण विकी आपल्या भूमिकेनुसार स्वत:च्या शरीरावर घेत असलेली मेहनत. मसान चित्रपटातला वजन कमी केलेला विकी आणि उरी, सरदार उधमसाठी त्यानं केलेलं बाॅडी ट्रान्सफाॅर्मेशन पाहून प्रेक्षकांना नवल वाटतंच . प्रत्येक भूमिकेनुसार बाॅडी ट्रान्सफाॅर्मेशन करणं ही सोपी गोष्ट नाही. व्यायाम आणि आहाराचे कडक नियम यातून विकीला सतत जावं लागतं. आताही येत्या चित्रपटातील भूमिकेसाठी विकीला फिटनेससाठी स्टार फिटनेस ट्रेनर मुस्ताफा अहमद आणि डाएटसाठी सेलिब्रेटी शेफ अक्षय अरोरा यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार विकी आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो आहे. हे सर्व व्यावसायिक पातळीवर होत असलं तरी विकीच्या या व्यावसायिक प्रयत्नांना त्याची आई वीणा कौशल ही कौटुंबिक पातळीवर साथ देत आहे.
Image: Google
विकी कौशल हा परफेक्ट फॅमिली मॅन म्हणून ओळखला जातो. आई वडिलांसोबतचं त्याचं नातं, त्याचं साधं कौटुंबिक जीवन, साधी राहाणी ही केवळ चर्चेचा विषय नसून विकीच्या अभिनयासोबतच विकीतल्या या गुणांनी प्रेक्षकांचं हदय जिंकलंय. त्याच्या कौटुंबिक आणि मित्र परिवारात वीणा कौशल या केवळ विकीची आई म्हणून ओळखल्या जातात असं नाही. तर वीणा कौशल या उत्तम स्वयंपाक करतात. येणाऱ्या जाणाऱ्याला आपल्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ घालून तृप्त करतात ही त्यांची खास ओळख आहे. विकीला आपल्या आईच्या हातचा आलू पराठा खूप आवडतो. पण सध्या तो आपल्या भूमिकेसाठी खाणं पिणं, व्यायाम याचे कडक नियम पाळतोय हे त्याच्या आईलाही माहिती आहे. विकी कौशल हा नियम पाळताना कठोर असतो. डाएटसाठी चिट डे वगैरे असला तरी तो नियमांना कधीच चिट करत नाही. पण आपल्या मुलासाठीआलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत.
वीणा कौशल यांनी ट्विस्ट देऊन तयार केलेले आलूचे पराठे खाऊन विकीच्या फिटनेस आणि डाएट प्रशिक्षकांनाही बटाट्याशिवायचे चविष्ट आणि दमदार आलू पराठे खाऊन आश्चर्य वाटलं . आईच्या युक्तीमुळे विकीला आईच्या हातचे आलू पराठेही खाता आले आणि त्याचा ग्लुटेन फ्री डाएटचा नियमही मोडला नाही.
Image: Google
वीणा कौशल यांनी अशी कोणती युक्ती वापरली बरं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.ही युक्ती काय हे विकीच्या डाएट प्रशिक्षक अक्षय अरोरा यांनी सगळ्यांना सांगितलं. आलू शिवायचा आलू पराठा तोही ग्लुटेन फ्री कसा करावा याची युक्ती विकीच्या आईकडे आहे. ग्लुटेन फ्री आलू पराठा तयार करताना त्यांनी ग्लुटेन फ्री पीठ, ग्लुटेन फ्री बटाट्यासाठी बटाट्याला पर्याय म्हणून रताळी वापरली. बाकी आलं, गरम मसाला, चाट मसाला, तिखट, जिरे, कोथिंबीर वापरुन त्यांनी हा ग्लुटेन फ्री पराठा तयार केला आणि तो पराठा वेगन दह्यासोबत खायला दिला.
रताळी ही तर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण ज्यांना बटाट्याचा पराठा खायचा नाही त्यांच्यासाठी रताळी घालून केलेला पराठा हा उत्तम पर्याय आहे हे विकीच्या आईला सुचला आणि हा बटाट्याशिवायचा बटाटा पराठा सगळीकडे चर्चेचा विषय झाला. कोणत्याही आईप्रमाणेच विकी कौशलची आईही त्याच्यावर प्रेम करते. मुलांच्या आवडीची निवडीचं खाऊ पिऊ घालून त्यांना आनंदी करणं हे कोणत्याही आईला आपलं मुख्य कर्तव्य वाटतं. असं वाटण्यातल्याच वीणा कौशलही आहे. पण त्यांनी यासाठी आपल्या मुलाचा डाएट नियम न मोडता उलट आरोग्यदायी पर्याय शोधून त्याला त्याच चवीचा पराठ खाऊ घातला, पण सगळीकडे विकी कौशलच्या आईचं कौतुक होतंय.
Image: Google
ग्लुटेन फ्री बटाट्याशिवायचा बटाटा पराठा कसा करायचा?
हा पराठी पिठात सर्व् सामग्री मिसळूनही करता येतो आणि भरलेल्या पराठ्यासारखाही करता येतो. ग्लुटेन फ्री हवा असल्यास ग्लुटेन फ्री कणिक दुकानात मिळते, ती आणावी. दोन मोठी रताळी, हिरवी मिरची/ लाल तिखट, हळद, हिंग, किसलेलं आलं, मीठ, कोथिंबीर, चाट मसाला, गरम मसला आणि तेल घ्यावं.
Image: Google
ग्लुटेन फ्री पराठा करताना आधी रताळी धुवून कुकरला लावून बटाट्यांप्रमाणे शिजवून घ्यावेत. ग्लुटेन फ्री गव्हाचं पीठ मऊसर मळून घ्यावं. ते 15-20 मिनिटं सेट होवू द्यावं. शिजून गार झालेली रताळी आधी सोलावी. मग ती किसून घ्यावी किंवा हातानं कुस्करुन घ्यावी. कढईत थोडं तेल घालून तापवावं. तेलात किसलेलं आलं, सर्व मसाले टाकून ते मंद आचेवर परतावेत. मग त्यात कुस्करलेले रताळे घालून परतून घ्यावं. सर्वात शेवटी सारणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सारण गार होवू द्यावं.
पिठाच्या दोन लाट्यांच्या पोळ्या लाटाव्यात. एका पोळीवर रताळ्याचं सारण भरुन ते नीट पसरुन घ्यावं. त्यावर दुसरी पोळी ठेवावी. त्याच्या दोन्ही कडा व्यवस्थित दाबून घ्याव्यात. पराठा गरम तव्यावर तूप किंवा तेल लावून खरपूस शेकावा, की झाला बटाट्याशिवायचा ग्लुटेन फ्री बटाट्याचा पराठा.