Join us  

१ वाटीभर मुगडाळ घ्या आणि करा कोलकाता स्टाइल गरमागरम व्हिक्टोरिया वडा! पाहा रेसिपी, घरबसल्या कोलकाताची सैर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 7:26 PM

Victoria Vada Recipe : मुगाच्या डाळीपासून तयार होणारा विक्टोरीया वडा ही कोलकात्याची स्पेशल डिश आहे.  

नाश्त्याला काहीतरी वेगळं खमंग खावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पोहे, उपमा, बटाट्याचे चिप्स यापेक्षा काही वेगळं खावसं वाटलं तर तुम्ही मुगाच्या डाळीचा पौष्टीक नाश्ता ट्राय करू शकता. (Make Kolkata style Victoria Vada using 1 bowl of Mung dal) मुगाच्या डाळीत डायटरी फायबर्सससह अनेक पौष्टीक घटक असतात त्यामुळे तब्येत चांगली राहते आणि आरोग्यही सुधारते. मुगाच्या डाळीची भजी, डोसे तुम्ही खाल्लेच असतील. (Victoria Vada Recipe)

मुगाच्या डाळीपासून तयार होणारा विक्टोरीया वडा ही कोलकात्याची स्पेशल डिश आहे.  चौहान विक्टोरीया वडा या नावानं कोलकात्यातील स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहे. अनेक राजकारण्यांनी या वड्याच्या स्टॉलला भेट दिली आहे. कोलकात्याची पारंपारीक रेसेपी ट्राय करून तुम्ही घरीसुद्धा हा वडा बनवू शकता. 

Chauhan Victoria Vada हा कोलकाता शहरातील कॅमॅक स्ट्रीट  मार्केटमध्ये असलेला खाद्यपदार्थाचा हा स्टॉल आहे. हा स्टॉल 1950 मध्ये बद्रीनाथ चौहान यांनी सुरू केला होता, जो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून आला होता आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र प्रसाद चौहान हे सांभाळतात .सध्या त्यांचे नातू अनुराग आणि पंकज चौहान हे स्टॉल चालवत आहेत.

या ठिकाणी येण्यापूर्वी हा स्टॉल व्हिक्टोरिया मेमोरियलच्या समोर होता. विक्टोरिया वडा, राजस्थानी डाळ का वडा सारखे स्नॅक म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश रहिवाशांमध्ये हा लोकप्रिय नाश्ता होता. 2013 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या डिशचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलला भेट दिली होती

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न