लोक गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 चा सामना करत असले तरी, महामारीच्या काळात सर्जनशीलतेची कमतरता भासली नाही. कोणी कोरोना व्हायरसवर कविता तर कोणी खाद्यपदार्थ तयार केले. आता सोशल मीडियावर कोरोना व्हायरस वड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Woman shares recipe of steamed corona vada)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला रेसिपीची सुरुवात अगदी बिनधास्तपणे करते, तांदळाचे पीठ, जिरे आणि मीठ घालून आवरणासाठी कोमट पाण्याने मळून घेते. मग सारणासाठी बटाटा, कांदा, किसलेले गाजर, सिमला मिरची, कढीपत्ता आणि काही मसाले घालून मिश्रण तयार करूते. बटाट्या वड्याच्या मिश्रणाप्रमाणे हा गोळा दिसतो.
सगळ्यात आधी कोविड-19 विषाणूसारखं आवरण दिसण्यासाठी ती भिजवलेल्या तांदळाचे लहान लहान गोळे करते आणि त्याप्रमाणे आकार देते. सुरूवातीला भाताच्या गोळ्याप्रमाणे हा वडा दिसतो. पण वाफवल्यानंतर या वड्याला कोरोना व्हायरसप्रमाणे आलेला आकार तुम्ही पाहू शकता.
“कोरोना वडा! भारत की नारी सब पर भारी!” असं कॅप्शन देत मिम्पी म्हणून ओळखल्या जाणार्या ट्विटर युजरसनं स्नॅक तयार करण्याचे तपशील शेअर करत पुन्हा रेसेपी शेअर केली आहे.