Join us  

Viral Food Combinations : आता हेच बाकी होतं! भावानं रुह अफजा टाकून चहाची चव पार बिघडवली; अन् व्हिडीओ पाहून लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 8:36 PM

Viral Food Combinations : सोशल मीडियावर रूफ अफजा घालून चहा बनवत असलेल्या एका तरूणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा हवाच असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  चहाप्रेमींना अनेक प्रकारचे चहा प्यायला आवडतात. काहींना वेलचीचा चहा, कुणाला आल्याचा चहा प्यायला आवडतो, तर अनेक जण तंदुरी चहाही पसंत करू लागले आहेत.

सोशल मीडियावर रूफ अफजा घालून चहा बनवत असलेल्या एका तरूणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या आगळ्या वेगळ्या चहाच्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंड करत आहे. (After drinking rooh afza tea you will also say let it be brother video is going viral)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुधात रुह अफजा मिसळत असल्याचे दिसून येते. चहा पूर्णपणे लाल होत आहे. त्यानंतर एक व्यक्ती चहा पिऊन फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला चहा अजिबात आवडत नाही. व्हायरल व्हिडिओ chatore_brothers नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केला आहे.

10 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 1 लाख 49 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - खरच बकवास चहा. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - हा गुलाबी चहा आहे, तो प्याल्यानंतर मानवी मेंदू काम करणे बंद करतो असं म्हटलं आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलअन्नपाककृती