सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळे खाद्यप्रयोग करणारे बरेच ब्लॉगर्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून पिझ्झा पुरणपोळी, रुह अफजा चहा, आईस्क्रिम नुडल्स, मिरिंडा गोलगप्पा असे वेगवेगळे खाद्यप्रयोग व्हायरल होत आहेत. नुकत्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुलगी पाणीपूरी सॅण्डविच बनवताना दिसतेय. याला तिनं गोलगप्पा सॅण्डविच असं नाव दिलं आहे. (Blogger Makes Quick Gol Gappa Sandwich; Divides The Internet)
आतापर्यंत तुम्ही रस्त्यावरील विक्रेत्यांकडून पाणीपूरी, शेवपूरी, पॅटीस, वडापाव, समोसा, असे अनेक पदार्थ खाल्ले असतील पण पाणीपूरी सॅण्डवीच कधीही खाल्ले नसेल. गोल गप्पा हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात प्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. तळलेले गोल पिठाचे गोळे मॅश केलेल्या बटाट्याच्या मसालेदार मिश्रणाने भरलेले असतात आणि त्यावर तिखट आंबट पाणी घातल्यानंतर तोंडात ठेवले जातात. आता बेंगळुरूमधील ब्लॉगरने गोल गप्पा सॅण्डविच तयार केले आहे.
व्हिडिओतील ब्लॉगरने डबल डेकर सँडविच बनवले; तिने प्रथम तिच्या ब्राऊन ब्रेडला हिरवी चटणी लावली, त्यावर कांदा आणि टोमॅटोच्या रिंग्ज ठेवल्या, नंतर दुसऱ्या ब्रेडच्या तुकड्याने झाकल्या. त्यावर तिने मॅश केलेले बटाटे आणि पुरीचा चुरा घालून सॅण्डविच केले., "हे खरोखर चांगले आहे, तुम्हीही करून पहा," असं म्हणत तिनं तुमचं आवडतं सॅण्डविच कोणतं आहे? असा प्रश्न विचारला आहे.