Join us  

Viral Food Combinations : आता हेच बाकी होतं! पाणीपुरी आईस्क्रीमचा अतरंगी प्रयोग पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 1:19 PM

Viral Food Combinations : अंजली म्हणाली पाणीपुरी तिखट पाणी आणि मसालेदार पदार्थांसाठी ओळखली जाते. त्यामुळे आईस्क्रीमची गोड चव पाणीपूरीमध्ये जागा किती जणांना आवडेल, हा प्रश्न अजूनही मला पडलाय.

भारतात जवळजवळ प्रत्येकालाच संध्याकाळच्या वेळी पाणीपूरीचा आस्वाद घ्यायला आवडतो. पाणीपूरी म्हणजे फूड लव्हर्सचा जीव की प्राण. हा पदार्थ सर्व वयोगटातल्या लोकांना आवडतो. जेव्हा बेंगळुरूमधील एका फूड ब्लॉगरने पाणी पुरी आइस्क्रीम बनवले तेव्हा सोशल मीडियावर विचित्र प्रतिक्रिया उमटल्या. आता अंजली धिंग्रा या ब्लॉगरनं हा चित्र विचित्र प्रयोग केला आहे. तिनं इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये सांगितले की शहरातील एका  हॉटेलमधून तिनं होम डिलिव्हरी करत हा पदार्थ मागवला. (Food Blogger's Paani Puri Ice Cream Video Is A Hit Online But Its Taste Not So Much)

व्हिडीओची सुरुवात करताना अंजलीने तिच्या दर्शकांना पाणीपुरी आईस्क्रीमबद्दल कधी ऐकले आहे का असं विचारलं. मिठाईचे पॅकेट हातात धरून अंजली म्हणाली की तिने ते बेंगळुरूमधील डॉक फ्रॉस्टड नावाच्या हॉटेलमधून ऑर्डर केले आहे आणि ती आता ते खाऊन पाहणार आहे. अंजलीने फूड पॅकेट काढले आणि त्यात आईस्क्रीमच्या कपाच्या मध्यभागी पुरी व्यवस्थित ठेवली होती. अंजलीनं  हे आईस्क्रीम टेस्ट केलं आणि त्याचा रिव्हीव्हसुद्धा दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरी थंडगार आईस्क्रीमने वेढलेली असूनही कुरकुरीत राहिली.

हातात स्वर्गीय आईचा फोटो, वडिलांचा हात धरुन नवरी मंडपात आली; बापलेकीला पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी..

क्षणभर असे दिसून आले की, अंजली चवीने गोंधळली होती पण लगेचच तिनं आणखी आईस्क्रीम खायला सुरूवात केली.  “आंबट चिंचासारखी आइस्क्रीमची चव आहे,” असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.  याशिवाय अंजली म्हणाली की,  “पाणीपुरी तिखट पाणी आणि मसालेदार पदार्थांसाठी ओळखली जाते. त्यामुळे आईस्क्रीमची गोड चव पाणीपूरीमध्ये जागा किती जणांना आवडेल, हा प्रश्न अजूनही मला पडलाय.”

केसांचा झाडू झालाय? शॅम्पू बदलूनही गळणं थांबत नाहीये? दाट, काळ्याभोर केसांसाठी 'हा' घ्या घरगुती हेअर मास्क

 या व्हिडिओला 147,000 हून अधिक लोकांनी पाहिलंय आहेत आणि अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यापैकी अनेकांनी आश्चर्यकारक खाद्यप्रयोगांचा अनुभव शेअर केला आहे. याआधीसुद्धा फॅन्टा मॅगी,  नुडल्स आईस्क्रीम,  पिझ्झा पुरणपोळी असे खाद्य प्रयोग तुफान व्हायरल झाले होते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.