वर्षाचे सगळेच दिवस लोकांना उसाचा रस खूप आवडतो. पण गरमीच्या वातावरणात उसाच्या रसाचा एक घोट स्वर्ग सुख देऊन जातो. सोशल मीडियावर विचित्र फूड कॉम्बिनेशन्सचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता उसाच्या रसाचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा रंग पाहून लोक त्याला 'खूनी गन्ने का ज्यूस' असे नाव देत आहेत. (Bloody sugarcane juice video )
व्हिडीओमध्ये दिसणारा उसाचा रस तुम्ही क्वचितच प्यायला असेल. त्याचे नाव ऐकताच अनेकजण घाबरले. गाझियाबादमध्ये रस्त्यावर एक विक्रेता हा लाला रंगाचा उसाचा रस विकताना दिसला. या उसाच्या रसात ट्विस्ट करून तो सर्व्ह करत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ फूडी विशाल नावाच्या फूड ब्लॉगरने शेअर केला आहे.
गाझियाबादमध्ये एका विक्रेत्याने रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाचा स्टॉल लावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक त्याच्याकडे 'रक्तरंजित उसाचा रस' मागतात. हा माणूस आधी उसाचा रस काढतो त्यानंतर त्यात बीट मिसळतो. त्यामुळे उसाच्या रसाचा रंग लाल होतो.
लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं पाहताच चपलेनं चोप चोप चोपला; पाहा व्हिडीओ
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुकानदार अतिशय अनोख्या पद्धतीने हा रक्त उसाचा रस लोकांना देतात. दुकानदार हा रस ब्लड पाऊचमध्ये टाकतो आणि ब्लॉगरला प्यायला देतो. असे पाऊच तुम्हाला रुग्णालयता पाहायला मिळतात. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारोंनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत ब्लॉगरने 'मॉडर्न उसाचा रस' असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 65 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.