'बॉलीवूडचा भिडू' अर्थात जॅकी श्रॉफ आपल्या हटके बोलीशैली आणि अभिनयासाठी ओळखला जातो. त्यांची मुंबई स्टाईल टपोरी भाषा खूप चर्चेत असते. सध्या ते सिनेसृष्टीपासून दूर जरी असले तरी, ते सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. जॅकी श्रॉफ यांचे रेसिपीजचे व्हिडिओ सोशल मिडीयावर फार व्हायरल होतात.
नुकतंच त्यांचा कांदा - भेंडी या रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपल्या मुंबई स्टाईल टपोरी भाषेत, कांदा - भेंडी ही रेसिपी कशी तयार करायची हे सांगितले आहे. आपल्याला देखील रोजची त्याच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, झटपट कांदा - भेंडी ही रेसिपी करून पाहा. चवीला भारी - बनवायला सोपी ही रेसिपी झटपट तयार होते(Viral Kanda Bhindi recipe by Jackie Shroff | Apnabhidu).
कांदा - भिंडी करण्यासाठी लागणारं साहित्य
कांदा
भेंडी
चपात्या वातड-कडक होतात? मऊ-मुलायम चपात्या करण्यासाठी टाळा ५ चुका, चपात्या शिळ्याही राहतील मऊ
तेल
मीठ
लाल - तिखट (ऑप्शनल)
कृती
सर्वप्रथम, एक मोठा कांदा, मध्यम चौकोनी आकारामध्ये चिरून घ्या. एका वाटीत पाणी घ्या, त्यात चिरलेला कांदा घालून ठेवा. पाव किलो भेंडी घ्या, व मध्यम आकारामध्ये भेंडी चिरून घ्या. भेंडी जास्त बारीक चिरू नका.
एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी
गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये २ चमचे तेल घाला, व गॅस मध्यम आचेवर ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा घातल्यानंतर लगेच भेंडी घाला. परंतु, चमच्याने कांदा - भेंडी ढवळू नका. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून कांदा आणि भेंडी वाफेवर शिजेल. ५ मिनिटानंतर त्यावर बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ, हवं असल्यास आपण त्यात लाल तिखट देखील घालू शकता.
शेवटी थोडं चमच्याने मिक्स करून कांदा - भेंडीची भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्या. व गरमागरम भेंडीची भाजी आणि चपातीचा आनंद लुटा.