सुप्रसिद्ध सेलिब्रिटी स्टार्स नेहमी काय खात असतील किंवा त्यांचा आवडता पदार्थ कोणता असेल , त्यांचे डाएट कसे असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी बऱ्याचजणांना असते. मोठमोठे सेलिब्रिटी देखील त्यांच्या खानपानाच्या सवयी किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ याबद्दल सविस्तर माहिती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. मग यातील आपला आवडता सिलेब्रिटी किंवा अभिनेत्री यांच्या आवडीच्या पदार्थांची नावे आणि रेसिपी समजली की आपण लगेच तो पदार्थ आपल्या घरच्या किचनमध्ये किमान एकदा तरी ट्राय करुन पाहतो. अशाप्रकारे, नुकतेच व्हॉट वुमन वॉण्टस (What Women Wants) या कार्यक्रमांत करीना कपूर हिने नीना गुप्ता (Neena Gupta) यांची मुलाखत घेतली(Neena Gupta's rotizza recipe).
या मुलाखतीदरम्यान, गप्पा मारताना तुमचा आवडता पदार्थ कोणता जो तुम्हाला बनवायला आणि खायला आवडतो असे करीनाने विचारल्यावर नीना गुप्ता यांनी 'रोटीझ्झा' अशा एका भन्नाट पदार्थाचे नाव आणि रेसिपी शेअर केली आहे. या पदार्थाचे नाव ऐकून तुम्हांला देखील प्रश्न पडला असेल की हा पदार्थ नेमका कोणता आहे आणि तो कसा तयार करायचा...नीना गुप्ता यांना आवडणारा 'रोटीझ्झा' (Rotizza) हा पदार्थ म्हणजे नेमकं काय आणि तो कसा करायचा याची रेसिपी पाहूयात(Viral Neena Gupta's all time favourite Rotizza).
नीना गुप्तांच्या आवडीचा पदार्थ 'रोटीझ्झा' म्हणजे नेमकं काय ?
आपल्या रोजच्या जेवणात चपाती असतेच. परंतु काहीवेळा जास्तीच्या चपात्या उरतात अशावेळी, त्या उरलेल्या चपात्यांचे अनेक झटपट होणारे सहजसोपे पदार्थ आपण करतो. शक्यतो रात्रीच्या जेवणातील चपात्या उरल्या तर सकाळी आपण फोडणीची चपाती, चपातीचा चिवडा, चपातीगुळाचा लाडू असे अनेक पदार्थ तयार करतो. परंतु काहीवेळा हे चपातीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी काहीतरी नवीन खावेसे वाटते. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आवडता पदार्थ 'रोटीझ्झा' हा चक्क उरलेल्या चपाती पासून झटपट तयार करता येतो. 'रोटी' आणि 'पिझ्झा' या दोन पदार्थांचे कॉम्बिनेश असलेला हा एक पदार्थ असल्याने याला 'रोटीझ्झा' असे नाव देण्यात आले आहे.
हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...
'रोटीझ्झा' तयार करण्यासाठी आपण उरलेल्या किंवा ताज्या तयार केलेल्या चपात्यांचा वापर करु शकतो. आपण नेहमी करतो तशा चपात्या तयार करून घ्याव्यात. त्यानंतर या चपातीवर थोडेसे बटर पसरवून लावून घ्यावे. त्यावर आपल्या आवडीप्रमाणे सॉस किंवा पिझ्झा स्प्रेड किंवा इतर सॉस पसरवून लावून घ्यावे. आता या चपातीवर आपण पिझ्झा प्रमाणेच आपल्या आवडत्या भाज्या चिरून किंवा त्यांचे काप करून घालू शकतो. टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, बेबी कॉर्न, पनीर, यांसारख्या भाज्यांचा वापर आपण करु शकता. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स भुरभुरवून घ्यावे. त्यानंतर पुन्हा त्यावर थोडे बटर वरून सोडावे आणि ओव्हन मध्ये किंवा तव्यात 'रोटीझ्झा' ठेवून वरून झाकण ठेवून ५ ते १० मिनिटांसाठी बेक करून घ्यावा. 'रोटीझ्झा' बेक झाल्यानंतर त्याचे पिझ्झा सारखे त्रिकोणी तुकडे करावेत आणि खाण्यासाठी सॉससोबत सर्व्ह करावा. अशाप्रकारे आपण उरलेल्या चपाती पासून पटकन तयार होणारा आणि लहान मुलांना आवडणारा पौष्टिक चपातीचा पिझ्झा खाण्यासाठी देऊ शकतो.
कोथिंबीर वडी आवडते पण बेसनाचा त्रास होतो? पाहा बेसन न वापरता कोथिंबीर वडीची कुरकुरीत रेसिपी...