सध्या वेगवेगळे पदार्थ करण्याच्या नावाखाली कोण काय करेल, काही सांगता येत नाही. म्हणूनच तर कधी मॅगीच्या पोळ्या लाटल्या जातात तर कधी गुलाबजामचा पराठा केला जातो. आता सिझननुसार वेगवेगळ्या फळांचे आईस्क्रिम करतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. पेरुचं आईस्क्रिम आणि त्यावर लाल तिखट, हे देखील आपण अनेकदा खाल्लेलं असतं किंवा पाहिलेलं असतं. आता याच रेसिपीवरचा कळस म्हणावा, असं एक झणझणीत आईस्क्रिम बाजारात आलेलं आहे. चक्क हिरव्या मिरच्या घालून केलेल्या या आईस्क्रिमची रेसिपी सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. (Viral recipe of chilli roll ice cream)
मिरचीच्या आईस्क्रिमचा हा व्हिडिओ thehungrysurati या पेजवरून शेअर करण्यात आला असून त्या रेसिपीला Chilli roll icecream असं नाव दिलं आहे.
ऐन पावसाळ्यात तुळस सुकली, पाने झडून चालली? ३ सोपे उपाय, तुळस पुन्हा बहरेल- होईल डेरेदार....
सुरत येथील एका खाऊ गल्लीमध्ये हे आईस्क्रिम मिळतं, असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. हे आईस्क्रिम बनवताना तो शेफ सगळ्यात आधी आईस्क्रिम एका पॅनवर टाकतो.
त्यावर चक्क हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकतो. मिरच्या परतून किंवा भाजून घेतलेल्या नसाव्या, असं त्यांच्या रंगावरून दिसतं. त्यानंतर ते सगळा मिश्रण एकत्रित ठेचतो आणि ते पॅनवर पसरवून त्याचे रोल करतो.
तुम्हाला माहिती आहे का टाईमपास म्हणून मोबाईल बघत असताना कसं बसावं? योग्य पद्धत- पाहा व्हिडिओ
हे रोल बाऊलमध्ये सर्व्ह केल्यानंतर त्यावर हिरव्या रंगाचा सॉसही टाकलेला दिसतो. आता हे गोड- तिखट आईस्क्रिम चवीला नेमकं कसं लागत असणार, हे चाखूनच पाहावं लागेल.