Join us  

कारले पकोड्यांची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा... पाहा क्रिस्पी- कुरकुरीत रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 6:20 PM

Food And Recipe: कारले भजी किंवा कारले पकोड्यांच्या या रेसिपीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बघा नेमका आहे कसा हा प्रयोग..(bittergaurd pakode recipe)

ठळक मुद्देही भजी चवीला खरोखरच उत्तम असून एकदा टेस्ट करायला किंवा घरी करून बघायला हरकत नाही, असंही काही नेटिझन्सनी सुचवलं आहे. 

खाद्य पदार्थांच्या वेगवेगळ्या रेसिपी किंवा मग खाद्य पदार्थांमधे केले जाणारे काही विचित्र प्रयोग यांची सोशल मिडियावर नेहमीच चर्चा होते. एखादा प्रयोग चांगलाच हिट होऊन जातो. तर एखादा प्रयोग अगदी सपशेल फेल जातो. अशा पदार्थाला मग सोशल मिडियावर जबरदस्त ट्रोल केले जाते. आता सध्या सोशल मिडियावर असाच एक प्रयोग व्हायरल झाला आहे. तो प्रयोग म्हणजे कारले पकोडे किंवा कारल्याची भजी (karela pakode recipe). कडू कारल्याचं नाव घेताच अनेकांचं तोंड कडू होतं. पण हा प्रयोग मात्र तोंडाला चव आणणारा आहे, अशी प्रतिक्रिया काही खवय्यांनी दिली आहे.(How to make bittergaurd pakode?)

 

yummybites_kt या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो दिल्ली येथील फूड स्ट्रीटवरचा आहे. कारल्याची भाजी किंवा फ्राय केलेली कारली हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो.

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंगचं प्रगतीपुस्तक झालं व्हायरल, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले.....

कारण ते अशा पद्धतीने केले जातात की कारल्याचा कडवटपणा अगदी नावालाच राहतो. तसंच काहीसं या कारले पकोड्यांचं आहे. त्यामुळे ही भजी चवीला खरोखरच उत्तम असून एकदा टेस्ट करायला किंवा घरी करून बघायला हरकत नाही, असंही काही नेटिझन्सनी सुचवलं आहे. 

 

कशी केली कारल्याची भजी?१. कारल्याची भजी करण्यासाठी सर्वप्रथम बेसन पीठ कालवून घेतलं. त्यात अर्थातच मीठ, तिखट, धने- जिरे पूड असे वेगवेगळे पदार्थ टाकलेले असणारच.

थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल 

२. त्यानंतर कारले उभे चिरण्यात आले आणि त्यातील सगळ्या बिया काढून टाकल्या. 

३. अशा चिरलेल्या कारल्यांमध्ये मग एक सुके सारण भरण्यात आले. हे सारण नेमके कशाचे तयार करण्यात आले होते, हे काही या रेसिपीमध्ये दाखवण्यात आलेले नाही.

४. अशी सारण भरलेली कारली मग बेसनपीठात कालवून कढईमध्ये तळून काढली.

५. अशा गरमागरम पकोड्यांचे काप करून त्यावर चिंच- पुदिन्याचं पाणी आणि कांदा टाकून खवय्यांना सर्व्ह करण्यात आले. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरल