चपात्या गोल, टम्म फुगलेल्या आणि व्यवस्थित बनवणं हे काही सोप्पं काम नाही. रोज चपात्या करत असलेल्या काही पुरूषांना आणि बायकांनाही मऊ, परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट माहीत नसतं. खूप कमी लोक गोलकार चपाती बनवू शकतात. आता एका अमेरिकन मुलाने चपाती बनवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. व्हिडिओच्या मध्यभागी हा तरूण रोटी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगतो आणि नंतर पीठ मळून भारतीय शैलीतील मध्यम गोल चपाती बनवतो. चपाती तयार झाल्यानंतर तो यावर मऊपणा येण्यासाठी बटर लावतो. (Viral video of american boy who made roti like indian women whole internet impresses after seeing this beautiful video)
व्हिडिओमध्ये मुलगा ज्या पद्धतीने रोटी बनवताना दिसत आहे, ते पाहून कोणीही सांगू शकेल की हे किती सोपे आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, संपूर्ण इंटरनेट अमेरिकन मुलाच्या कलेवर प्रभावित झाले. हा व्हिडिओ ईटन बर्न्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे.
अरेरे! पेस्ट्री बेसन पिठात घोळवून भजीसारखी तळली; अन् तोंडात टाकताच कशी रिॲक्शन दिली पाहा
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी हे सतत बनवत नाही असे म्हटले तर ते खोटे ठरेल.' व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स खूप प्रभावित झाले आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'चपाती बनवताना किती उत्साह आहे. मला त्याचा तिरस्कार आहे. चपाती कधीच गोल होत नाही.'' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे, हे कबाब आणि ग्रेव्हीसोबत खा, मजा येईल.