Join us  

Video shows how jaggery is made : ताज्या ऊसापासून गुळ बनवताना पाहिलाय का? व्हायरल होतोय गुळाच्या रेसेपीचा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 2:21 PM

Viral video shows how jaggery is made : गावाकडच्या लोकांनी गुळ बनवण्याची पारंपारीक पद्धत अनेकदा पाहिली असेल. पण शहरी लोकांचा प्रत्यक्ष संबंध नसल्यानं असं पाहायला मिळत नाही.

गुळाचे शरीराला मिळणारे गुणकारी फायदे तुम्हाला माहीत असतील. तज्ज्ञांकडून नेहमीच साखरेपेक्षा गुळाचं सेवन करण्याचा सल्ला जातो. हिवाळ्यात लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ बनवताना गुळाचा वापर केला जातो.  उसाच्या रसापासून बनवलेल्या गुळाच्या ढेपी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात वापरला जाणारा एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. पण गुळ कसा बनवतात हे कधी पाहिलयं का?  (Viral video shows how jaggery is made)

गावाकडच्या लोकांनी गुळ बनवण्याची पारंपारीक पद्धत अनेकदा पाहिली असेल. पण शहरी लोकांचा प्रत्यक्ष संबंध नसल्यानं असं पाहायला मिळत नाही. सोशल मीडियावर गुळ बनवण्याचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका फूड ब्लॉगरने गुळ तयार करण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

शाब्बास पोरी! गर्भवतीला हॉस्पिटलला नेताना रिक्षा बिघडली; वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी चिमुरडीनं BMW थांबवली

फूड ब्लॉगर विशालने यूट्यूबवर शेअर केलेला व्हिडिओ गुळ कसा बनवला जातो  याचे तपशीलात वर्णन करतो. या क्लिपची सुरुवात गुळ बनवण्यासाठी निवडलेल्या ठिकाणापासून होते. उसाच्या रस काढून झाल्यानंतर उसाच्या काड्यांचे ढीग पडलेले असतात. 

कमालच केली! जीन्स घालूनच चालणार सप्तपदी; लग्नासाठी मुलीची अनोखी अट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

शुद्धीकरणाच्या आणखी काही प्रक्रियांनंतर रस उच्च आचेवर मोठ्या भांड्यात ठेवला जातो. व्हिडिओला 73,000 हून अधिक व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. गूळ कसा बनवला जातो हे पाहून काहीजण थक्क झाले, तर काहींनी ताज्या गुळामुळे तोंडाला पाणी सुटल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :अन्नसोशल व्हायरलपाककृती