Join us  

Viral video : 'स्वयंपाकात जरा तेल कमी वापर!' असं लेकानं म्हणताच संतापलेल्या आईनं दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:25 PM

Viral video son asked the mother to put less oil : खूप मुलं घरात तेल आणि तुपाचे सेवन कमी करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.

आजकालच्या तरुणांमध्ये फिटनेस डाएटबाबत खूप जागरूकता आहे. आपल्या खाण्यापिण्यात फॅट्स असलेल्या गोष्टी टाळण्यासाठी ते आपल्या आईला घरी कमी तेलकट पदार्थ शिजवण्याची विनंती करतात. पण प्रत्येक आईला तिच्या मुलांना सकस आणि पौष्टिक आहार द्यायचा असतो.  रोज स्वयंपाक करत असलेल्या आईला स्वयंपाक कसा करायचा हे लेक सांगायला लागल्यावर तिरा या गोष्टींचा राग येतो. (Son asked the mother to put less oil in the food)

खूप मुलं घरात तेल आणि तुपाचे सेवन कमी करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे. मुलगा आल्यावर आई  स्वयंपाकघरात चिला बनवत आहे. इतक्यात लेक असं काही बोलतो आणि रागानं लाल होते. (Viral video son asked the mother to put less oil in the food angry mom scold him)

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आई स्वयंपाकघरात उभी असताना बेसनाचा चिल्ला बनवत आहे आणि अचानक तिचा मुलगा तिथे पोहोचतो.  तो त्याच्या आईला सल्ला देतो की माझ्या चिल्यामध्ये तूप, तेल असे काहीही ओतू नके. यावर आई खूप चिडते आणि म्हणते, 'मग काय आता पाण्यात चिला बनवू का?'

७ आजारांना लांब ठेवते 'ही' स्वस्तात मस्त भाजी; पोटाचे त्रास तर कायम राहतील लांब

रागाने लाल झालेली आई पुढे म्हणाली, 'चीला कसा बनणार? थोडे तेल घालावे लागेल. यानंतर मुलगा म्हणतो की संपूर्ण आहार खराब होतो. हे ऐकून आई आणखीनच संतापते आणि म्हणते की मग तुम्हीच बनवा. स्वतः बनवता तेव्हा जगभरचे मसाले टाकता तेव्हा तुला चालतं का?  स्वतः बनवताना जेवणासाठी जे काही वापरता,  त्यानं काहीही होत नाही आणि जेव्हा मी देशी तूप, तेल नाश्त्यासाठी वापरते तेव्हा ते तुला आवडत नाही.' 

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

यानंतर मुलगा म्हणतो की, 'देशी तुपात सुद्धा खूप चरबी असते.   मग आई म्हणते, 'चीला नहीं मिलगा, करछी मिल जायेगी. जो मिल रहा है शांती से खा लो.' हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा विनोदी व्हिडिओ हसवणारा तितकाच तरूणांना विचार करायला लावणाराही आहे. 

टॅग्स :अन्नसोशल मीडियासोशल व्हायरल