Join us  

विराट कोहलीला आवडते तसे ‘प्रोटीन सॅलेड’ करा, वजन राहते नियंत्रणात आणि पचायला हलके-पौष्टिकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 3:16 PM

VIRAT KOHLI FAVOURITE PROTEIN SALAD : विराट कोहली म्हणतो मी चवीचा विचार करणं सोडलंय, पण तरी त्याला आवडते तसे सॅलेड आपणही खाऊच शकतो...

वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू टीमची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. भारतभर या भारतीय टीममधील सगळ्यांचेच कौतुक होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या फिटनेसबद्दल चर्चा होत असताना सर्वात पहिले नाव समोर येते ते म्हणजे विराट कोहली. स्वतःच्या फिटनेस आणि फिट राहण्याबाबतीत विराट नेहमीच आपले डाएट आणि एक्सरसाइज यांचे काटकोर पद्धतीने पालन करतो. तरूणांचा आदर्श असणारा विराट हा फिटनेसच्या बाबतीतही खरंच आदर्श ठरतोय. सोशल मिडियावरही विराटचे अनेक जिममधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय भारतीय क्रिकेटर्समध्ये फिटनेस ट्रेंडही विराटमुळे सुरू झाला असल्याचे लक्षात येते. 

काही दिवसांपूर्वीच विराटने वेगन डाएट फॉलो करण्यास सुरुवात केली होती. त्याने आपल्या आवडीचे नॉनव्हेज पदार्थ व डेअरी प्रॉडक्ट्स खाण सोडून दिलं होत. विराट फुडी असला तरीही तो नेहमी हेल्दी खाण्यावरच भर देताना दिसतो. विराट आपले फिटनेस मेंटेन करण्यासाठी त्याच्या रोजच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड खाणे पसंत करतो. यामुळे त्याचे वजन तर नियंत्रणात राहते सोबतच त्याचे आरोग्य व फिटनेस अगदी उत्तम पद्धतीने बॅलेन्स राहण्यास मदत होते. विराटच्या आवडीचा हा सॅलॅडचा प्रकार नेमका कोणता ते पाहूयात(Virat Kohli’s favorite Superfood Salad is something everyone should try).  

साहित्य :- 

१. दही - १ कप २. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ३. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. छोले - २ टेबलस्पून (उकडवून घेतलेले) ६. चणे - २ टेबलस्पून (उकडवून घेतलेले) ७. हिरवे मोड आलेले मूग - २ टेबलस्पून (उकडवून घेतलेले)८. मोड आलेले मेथी दाणे -  २ टेबलस्पून९. काकडी - अर्धा कप १०. बीट - अर्धा कप ११. कोबी - अर्धा कप १२. कांदा - अर्धा कप १३. टोमॅटो - अर्धा कप १४. कोथिंबीर - १ टेबलस्पून १५. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)१६. लिंबाचा रस - १ टेबलस्पून १७. पांढरे तीळ - १ टेबलस्पून (भाजून घेतलेले)१८. रोस्टेड पनीर - १ मोठा तुकडा 

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब-मूडही होतो छान..

उपवासाला नुसताच साबुदाणा कशाला ? खा पौष्टिक ५ पारंपरिक, आरोग्यदायी पदार्थ, उपवास होईल हेल्दी... 

कृती :-

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दही घ्यावे. या दह्यात प्रत्येकी १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड व चवीनुसार मीठ घालावे. २. त्यानंतर या बाऊलमध्ये उकडवून घेतलेले छोले, चणे व मोड आलेले हिरवे मूग, मेथी दाणे घालावेत. 

३. आता या मिश्रणावर काकडी, बीट, कोबी, कांदा, टोमॅटो बारीक चिरून किंवा त्यांचे काप करून घालावेत. ४.  त्यानंतर त्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, भाजून घेतलेले पांढरे तीळ वरुन घालावेत.  ५. सगळ्यात शेवटी यावर हलकेच, खरपूस भाजून घेतलेल्या पनीरचा तुकडा ठेवावा. 

अशा प्रकारे आपले हेल्दी सॅलॅड खाण्यासाठी तयार आहे. हे हेल्दी सॅलॅड नेहमी खालले असता वजन कमी करण्यास तसेच फिट राहण्यास मदत होते.

टॅग्स :अन्नफिटनेस टिप्स