आपल्याकडे जेवणानंतर शक्यतो काहीतरी गोड, थंडगार डेझर्ट खाण्याची अनेकांना सवय असते. या डेझर्ट प्रकारामध्ये, भारतात अतिशय लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. थंडगार दुधामध्ये वेगवेगळ्या फळांचे तुकडे घालून हे गारेगार, गोड फ्रुट कस्टर्ड (Sabudana Fruit Custard) बनवले जाते. फ्रुट कस्टर्ड (Vrat Ka Fruit Custard) हे डेझर्ट बनवायला सोपे, खायला पौष्टिक असा झटपट होणारा थंडगार डेझर्टचा पदार्थ आहे. हे थंडगार आणि हेल्दी फ्रुट कस्टर्ड बरेचदा आपल्याकडे उन्हाळ्यात तयार केले जाते(Farali Sabudana Fruit Custard).
उन्हाळ्यात असे थंडगार फ्रुट कस्टर्ड खाणे म्हणजे पर्वणीच असते. एरवी उन्हाळ्यात खाल्ले जाणारे फ्रुट कस्टर्ड आपण चक्क उपवासाला देखील खाऊ शकतो. उपवासाचे फ्रुट कस्टर्ड कधी खाल्ले आहे का ? उपवासाला आपण साबुदाण्याचे अनेक पदार्थ खातो. साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. उपवासाला असे तेलकट पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. यासाठीच उपवासाला साबुदाणे वापरून थंडगार आणि हेल्दी असे उपवासाचे फ्रुट कस्टर्ड (Homemade Sabudana Fruit Custard) खाता येऊ शकते. उपवासाचे हे स्पेशल फ्रुट कस्टर्ड झटपट कसे तयार करायचे याची साधीसोपी रेसिपी पाहूयात(Navratri Special Sabudana Fruit Custard For Fasting).
साहित्य :-
१. तूप - १ टेबलस्पून २. साबुदाणा - १ कप ३. दूध - २ लिटर ४. केसर - ७ ते ८ काड्या ५. साखर - ३ ते ४ टेबलस्पून ६. वेलची पूड - चिमुटभर ७. केळ्याचे काप - १/२ कप ८. सफरचंदाचे लहान तुकडे - १/२ कप ९. डाळिंबाचे दाणे - १/२ कप १०. ड्रायफ्रुटसचे लहान तुकडे - ३ ते ४ टेबलस्पून
नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...
नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!
कृती :-
१. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घेऊन त्यात भिजवलेले साबुदाणे घालून ३ ते ५ मिनिटे हे साबुदाणे हलकेच परतून घ्यावे. २. साबुदाणे परतल्यानंतर त्यात हळुहळु थोडे दूध घालून सतत चमच्याने हलवत राहावे.३. आता या मिश्रणात केसरच्या काड्या आणि साखर घालून सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यावे. हे सगळे मिश्रण ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे.
उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट कॉफी करण्यासाठी दुधात केव्हा - किती चमचे कॉफी घालावी, पहा खास सिक्रेट...
४. या शिजवून घेतलेल्या मिश्रणात सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून चमच्याने मिश्रण हलवून घ्यावे. ५. आता हे तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवावे. मिश्रण संपूर्ण थंड झाल्यावर ते अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. ६. थोड्यावेळानंतर हे साबुदाण्याचे मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढून त्यात आपल्या आवडीप्रमाणे फळांचे काप किंवा लहान तुकडे कापून घालावेत. (आपण यात केळ्याचे काप, डाळिंबाचे दाणे, सफरचंदाचे तुकडे, चिकूचे तुकडे घालून शकता.) ७. सगळ्यात शेवटी वरुन ड्रायफ्रुट्सचे काप घालूंन हे उपवासाचे फ्रुट कस्टर्ड खाण्यासाठी सर्व्ह करावेत.
अशा प्रकारे आपण साबुदाण्याचा वापर करून झटपट तयार होणारे उपवासाचे फ्रुट कस्टर्ड करुन खाऊ शकता.