Lokmat Sakhi >Food > थांबा, या ७ गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका, कायम फ्रिजरमध्येच ठेवा! सुप्रसिद्ध शेफ सांगतात..

थांबा, या ७ गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका, कायम फ्रिजरमध्येच ठेवा! सुप्रसिद्ध शेफ सांगतात..

काही गोष्टी या फ्रिजपेक्षा फ्रिजरमध्ये जास्त चांगल्या राहतात, आता या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 04:54 PM2021-11-09T16:54:43+5:302021-11-09T16:58:52+5:30

काही गोष्टी या फ्रिजपेक्षा फ्रिजरमध्ये जास्त चांगल्या राहतात, आता या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया...

Wait, don't keep these 7 things in the fridge at all, keep them in the freezer forever! Well known chefs say .. | थांबा, या ७ गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका, कायम फ्रिजरमध्येच ठेवा! सुप्रसिद्ध शेफ सांगतात..

थांबा, या ७ गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका, कायम फ्रिजरमध्येच ठेवा! सुप्रसिद्ध शेफ सांगतात..

Highlightsफ्रिज नाही तर फ्रिजरमध्ये ठेवल्यावर चांगल्या राहतात या गोष्टी जाणून घ्या फ्रिज आणि फ्रिजरमध्ये पदार्थ साठवण्याविषयी...

फ्रिजरमध्ये काय ठेवायचे असते तर बर्फ, आइसक्रीम आणि पनीर किंवा फ्रोजन मटार वगैरे वगैरे असा आपला समज असतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी या फ्रिजरमध्ये ठेवणे आवश्यक असते. या गोष्टी साधारणपणे आपण फ्रिजमध्ये ठेवतो पण त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य जपले जाईलच असे नाही. तर या गोष्टी फ्रिजपेक्षा फ्रिजरमध्ये जास्त चांगल्या राहू शकतात. अशा काही गोष्टी तुम्ही फ्रिजरमध्ये साठवल्या तर स्वयंपाक करताना तुमची धावपळ न होता या घटकांचा वापर करुन तुम्ही पटकन एखादा पदार्थ तयार करु शकता. गडबडीच्या वेळी आपण हे फ्रिज केलेले पदार्थ पटकन वापरु शकतो आणि मुख्य म्हणजे फ्रिजरमुळे आपण त्यांचा साठाही करुन ठेऊ शकतो. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या साधारणपणे तुमच्या फ्रिजरमध्ये असायलाच हव्यात, पाहूया...

१. केळी - अनेकदा आपण केळी आणून ठेवतो पण बाहेरच्या वातावरणामुळे ती लवकर पिकतात आणि काळी पडायला लागतात. अशावेळी सालं काढून केळ्याचे तुकडे करुन एका झिपलॉक बॅगमध्ये ती फ्रिजरमध्ये ठेवावीत. त्यामुळे आपल्याला हवी तेव्हा आपण ती खाऊ शकतो आणि आणखी जास्त पिकण्यापासून थांबवू शकतो. प्रसिद्ध शेफ आणि रेसिपी क्रीएटर जेसिका रंधवा म्हणतात, आपल्याला केळ्याचा वापर करुन एखादी स्मूदी किंवा पॅनकेक करायचा असेल तर याचा नक्कीच उपयोग होतो. 

२. बटर - आपल्याकडे अनेकदा जास्तीचे बटर आणलेले असते. ब्रेडला लावण्यासाठी एखाद्या भाजीत घालण्यासाठी किंवा अगदी पोळी, डोसा यांसोबत खाण्यासाठी बटरचा उपयोग होतो. हे बटर फ्रिजमध्ये ठेवल्यास ते मऊ होते. त्यामुळे ते घट्ट राहावे असे वाटत असेल तर ते फ्रिजरमध्ये ठेवायला हवे. साधारणपणे चार महिन्यांपर्यंत अशाप्रकारे ठेवलेले बटर तुम्ही वापरु शकता. 

( Image : Google)
( Image : Google)

३. भात किंवा धा्न्यापासून केलेले पदार्थ - भात, उपमा, उकड यांसारखे वेगवेगळ्या धान्यांपासून केलेले पदार्थ जास्त झाले की आपण अगदी सहज ते प्रिजमध्ये ठेवतो. पण असे करण्यापेक्षा हे पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवायला हवेत. प्रसिद्ध शेफ लॉरेल शॉकी यांच्या म्हणण्यानुसार, शिजवण्यासाठी जास्त वेळ लागणारे पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक चांगले राहतात. हे अन्न फ्रिजरमधून काढून त्याचा तुम्ही आणखी एखादा वेगळा पदार्थ केला तर ते शिळे आहे हेही कळत नाही. 

४. लिंबू किंवा लिंबाचा रस - तुम्ही जेवणात लिंबाचा जास्त प्रमाणात वापर करत असाल तर लिंबू किंवा लिंबाचा रस फ्रिजरमध्ये ठेवणे केव्हाही चांगले असे प्रसिद्ध शेफ मारी सुराकूल म्हणतात. लिंबं पुळून त्याचा रस काढून तो आइस क्यूबमध्ये साठवून ठेवल्यास स्वयंपाक करताा तुम्ही हे क्यूब्स डायरेक्ट वापरु शकता. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचू शकतो. 

५. स्वयंपाकातील हर्बस - स्वयंपाकात आपण पुदीना, कोथिंबिर, कडिपत्ता असे अनेक प्रकारचे हर्बस वापरतो. या गोष्टी तुम्ही फ्रिजरमध्ये ठेवल्यास त्या खूप दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. ऐनवेळी वाटण करण्यासाठी किंवा एखादा पदार्थ सजवण्यासाठी वापरले जाणारे हे औषधी पदार्थ दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. 

( Image : Google)
( Image : Google)

६. आलं - घरात आलं आणले की ते अनेकदा वाळून जातं नाहीतर ते ओले असेल तर त्याला बुरशी येते. पण हे आलं जसंच्या तसं दिर्घकाळ टिकायचे असेल तर फ्रिजर हा उत्तम पर्याय आहे. फ्रिजरमुळे आलं चागलं राहण्यास मदत होते. 

७. चटण्या - आपण अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांसोबत खायला ओली चटणी करतो. पण ही चटणी जास्तकाळी टिकत नाही. मग अनेकदा ती फ्रिजमध्ये ठेवली तरीही चिकट किंवा खराब व्हायची शक्यता असते. अशावेळी जास्तीची झालेली टचणी फ्रिजरमध्ये ठेवायला हवी. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एखादा पदार्थ केल्यास थेट फ्रिजरमधून काढलेली चटणी तुम्ही वापरु शकता. 

Web Title: Wait, don't keep these 7 things in the fridge at all, keep them in the freezer forever! Well known chefs say ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.