महाराष्ट्रामध्ये झणझणीत चमचमीत पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. पदार्थ फक्त चवीला चांगला असून चालत नाही तो दिसतानाच तेवढा रुचकर दिसला पाहिजे म्हणजे भूक दुप्पट लागते. (Want a nice red color to your food? Try this simple trick..)जसे की पालेभाजीला छान हिरवा रंगा आल्यावर ती भाजी खाताना आणखी मज्जा येते. तिखट झणझणीत पदार्थ मस्त लालचुटूक दिसले की आणखी चविष्ट वाटतात. मसाला आमटी असेल किंवा मिसळ असेल त्यावर लाल रंगाचा तवंग आला की तो पदार्थ झकास दिसतो. फक्त दिसत नाही तर चवही मस्त लागते. मसालेदार भाजीलाही मस्त तवंग आला की ती भाजी सगळे आवडीने खातात. (Want a nice red color to your food? Try this simple trick..)घरी केलेल्या पदार्थांना विकतच्या पदार्थांएवढा तवंग येत नाही. विकतच्या पदार्थांना जेवढा तवंग तेवढे तेलही जास्त असते.
घरी भाजी -आमटी-मिसळ करताना तुम्हालाही मस्त लालेलाल तवंग यावा असे वाटते का? काहींना वाटते फोडणीमध्ये तेल जास्त घातल्याने तवंग येतो. त्यामुळे प्रचंड तेलकट भाजी लोक करतात तरीही तवंग काही येत नाही. मिसळीच्या तर्रीला जसा लाल रंग येतो तसा लाल रंग भाजी आमटीला यावा असे वाटत असेल तर ही एक टिप लक्षात ठेवा. तर्री करताना किंवा कट तयार करताना ही टिप लक्षात ठेवा. मसालेदार पदार्थ करताना त्यांना तवंग यावा यासाठी रंग वापरु नका. फुडकलर वापरुन तवंग आणता येत नाही. पाहा काय कराल.
फोडणी करताना सगळ्यात आधी फोडणीमध्ये थोडा नारळ टाका तो जरा परतून घ्या. नंतर त्यामध्ये चमचाभर साखर टाका. साखर विरघळली की त्यामध्ये लाल तिखट टाका. व्यवस्थित परतून घ्या. तिखट गडद रंगाचे झाले की त्यामध्ये पाणी ओता. मस्त तवंग तयार होईल. मग भाजी करत असाल तर भाजीचे साहित्य तसेच मिसळ किंवा आमटी करत असाल तर त्यासाठी लागणारी सामग्री नंतर त्या पाण्यामध्ये टाका आणि उकळवा. गॅस बंद केल्यावर जरा वेळ झाकून ठेवा. पुन्हा उघडून बघितल्यावर मस्त लालेलाल तवंग पदार्थावर दिसेल.