बंगाली गोड पदार्थ चवीला फारच अप्रतिम असतात. आपण सणासुदीला असे पदार्थ नक्कीच आणतो. (Want something sweet? see the traditional recipe of Mishti Doi)ही बंगाली मिठाई सोन्याच्या भावात विकली जाते असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. कारण या मिठाई फार महाग विकल्या जातात. त्यांना बाजारात मागणीही भरपूर असते. हे पदार्थ घरी तयार करणेही सोपेच आहे. एक मिष्टी दोई नावाचा बंगाली पदार्थ बाजारात मिळतो. (Want something sweet? see the traditional recipe of Mishti Doi)अगदी मऊ आणि जिभेवर ठेवल्यावर विरघळणारा असा हा पदार्थ फारच रुचकर लागतो. मिष्टी म्हणजे साखर आणि दोई म्हणजे दही. हे गोड दही घरी तयार करणं फार सोपं आहे. ही पाहा रेसिपी आणि नक्की तयार करा.
साहित्य
दही, दूध, साखर, सुकामेवा
कृती
१. गॅसवर दूध तापवत ठेवा. (Want something sweet? see the traditional recipe of Mishti Doi)अगदी मंद आचेवर तापू द्या. त्यामध्ये एखादी उकळी आल्यावर दूध स्वच्छ चमच्याने ढवळा. चमचा अगदी स्वच्छच वापरा नाही तर दूध फाटू शकते. दूध जरा आटले की मग गॅस बंद करा.
२. एका कढईमध्ये साखर घ्या. त्यामध्ये पाणी किंवा इतर कोणताही पदार्थ घालायचा नाही. साखर सतत ढवळत राहा नाही तर कढईला चिकटेल. साखर कॅरेमलाईज करून घ्यायची. साखर पूर्णपणे वितळली की लाल-तांबड्या रंगाची होईल मग गॅस बंद करा. तापवलेल्या दुधातील कपभर दूध त्या साखरेमध्ये घाला. आणि एकजीव होईपर्यंत ढवळा. गॅस पुन्हा चालू करा आणि परत ढवळा. दूध व साखर एकजीव झाल्यावर ते मिश्रण उरलेल्या दुधामध्ये ओता. अजिबात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.
३. एका फडक्यामध्ये छान गोड घरचे दही घ्या. व्यवस्थित पिळा आणि त्याचे पाणी काढून घ्या. व्यवस्थित सुके करून घ्या. त्यामध्ये तयार दुधाचे मिश्रण ओता. एकजीव करून घ्या. नंतर एका मातीच्या लहान मडक्यामध्ये ते मिश्रण ओता आणि रात्रभर झाकून ठेवा. तासभर बाहेर ठेवा नंतर फ्रिजमध्ये ठेवा. सुकामेवा छान बारीक कुटा आणि त्यावर टाका.