Lokmat Sakhi >Food > हटके चाट खाण्याची इच्छा होते? कोलकाता स्पेशल - व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा, चमचमीत रेसिपी वाढवेल जिभेची चव..

हटके चाट खाण्याची इच्छा होते? कोलकाता स्पेशल - व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा, चमचमीत रेसिपी वाढवेल जिभेची चव..

Kolkata Special Victoria Chaat Recipe चाट म्हटलं की अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. हटके कोलकाता स्पेशल व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2023 07:17 PM2023-01-08T19:17:14+5:302023-01-08T19:18:49+5:30

Kolkata Special Victoria Chaat Recipe चाट म्हटलं की अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. हटके कोलकाता स्पेशल व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा..

Want to eat hot licks? Try the Kolkata Special - Victoria Toast, the sparkling recipe will enhance the taste of the tongue.. | हटके चाट खाण्याची इच्छा होते? कोलकाता स्पेशल - व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा, चमचमीत रेसिपी वाढवेल जिभेची चव..

हटके चाट खाण्याची इच्छा होते? कोलकाता स्पेशल - व्हिक्टोरिया टोस्ट करून पाहा, चमचमीत रेसिपी वाढवेल जिभेची चव..

कोलकाता या शहरातील खाद्यसंस्कृती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रसगुल्ला. त्यांच्या खाद्यसंस्कृतीच्या यादीत गोड पदार्थांचा समावेश अधिक असतो. त्याचप्रमाणे त्यांची बोलीभाषा देखील तितकीच गोड आहे. कोलकाता या शहरात चमचमीत स्ट्रीटफूड खाणाऱ्यांचे दिवाने प्रत्येक चौकात मिळतील. तेथील फेमस स्ट्रीटफूड म्हणजेच व्हिक्टोरिया टोस्ट हा पदार्थ प्रचंड फेमस आहे. हा पदार्थ बनवायला सोपा तर आहेच, यासह खायला चविष्ट आणि चमचमीत लागते. चला तर मग या लज्जतदार पदार्थाची कृती जाणून घेऊया..

व्हिक्टोरिया टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य

३-४ ब्रेडचे स्लाइस

लिंबूचा रस

उकडलेला बटाटा

टोमॅटो

कांदा

कोथिंबीर

हिरवी चटणी

खोबऱ्याचे काप

चिंचेची चटणी

भाजलेले शेंगदाणे

मीठ

शेव

कृती

सर्वप्रथम, ब्रेडचे ब्राऊन काप कापून चौकोनी काप करा. त्यावर लाल तिखट शिंपडा. दुसऱ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाट्याचे काप, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिरवी चटणी, खोबऱ्याचे काप, चिंचेची चटणी, भाजलेले शेंगदाणे, मीठ, लिंबूचा रस आणि शेव मिसळून मिश्रण एकत्र करा.

मिश्रण एकत्र झाल्यानंतर दुसरीकडे ब्रेडवर चिंचेची चटणी लावा. त्यावर तयार मिश्रण पसरवा, त्यावर शेव, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे व्हिक्टोरिया टोस्ट खाण्यासाठी रेडी.

Web Title: Want to eat hot licks? Try the Kolkata Special - Victoria Toast, the sparkling recipe will enhance the taste of the tongue..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.