कोलकाता या शहरातील खाद्यसंस्कृती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रसगुल्ला. त्यांच्या खाद्यसंस्कृतीच्या यादीत गोड पदार्थांचा समावेश अधिक असतो. त्याचप्रमाणे त्यांची बोलीभाषा देखील तितकीच गोड आहे. कोलकाता या शहरात चमचमीत स्ट्रीटफूड खाणाऱ्यांचे दिवाने प्रत्येक चौकात मिळतील. तेथील फेमस स्ट्रीटफूड म्हणजेच व्हिक्टोरिया टोस्ट हा पदार्थ प्रचंड फेमस आहे. हा पदार्थ बनवायला सोपा तर आहेच, यासह खायला चविष्ट आणि चमचमीत लागते. चला तर मग या लज्जतदार पदार्थाची कृती जाणून घेऊया..
व्हिक्टोरिया टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य
३-४ ब्रेडचे स्लाइस
लिंबूचा रस
उकडलेला बटाटा
टोमॅटो
कांदा
कोथिंबीर
हिरवी चटणी
खोबऱ्याचे काप
चिंचेची चटणी
भाजलेले शेंगदाणे
मीठ
शेव
कृती
सर्वप्रथम, ब्रेडचे ब्राऊन काप कापून चौकोनी काप करा. त्यावर लाल तिखट शिंपडा. दुसऱ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाट्याचे काप, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिरवी चटणी, खोबऱ्याचे काप, चिंचेची चटणी, भाजलेले शेंगदाणे, मीठ, लिंबूचा रस आणि शेव मिसळून मिश्रण एकत्र करा.
मिश्रण एकत्र झाल्यानंतर दुसरीकडे ब्रेडवर चिंचेची चटणी लावा. त्यावर तयार मिश्रण पसरवा, त्यावर शेव, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे व्हिक्टोरिया टोस्ट खाण्यासाठी रेडी.