श्रद्धा कपूरला मराठमोळे पदार्थ आवडतात असे ती अनेकदा सांगते. श्रद्धाला नाश्त्यामध्ये पोहे तसेच इडली सांबरा खायला आवडेच मात्र तिला काकडीची भाकरी हा पदार्थ फार आवडतो. असे तिने सांगितले. (Want to eat Shraddha Kapoor's favorite cucumber bhakri? Get this delicious recipe)काकडीची भाकरी करायला अगदी सोपी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की खायला हवा असा हा पदार्थ आहे. रेसिपी अगदीच सोपी आहे.
साहित्यकाकडी, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पांढरे तीळ, मीठ, जिरे, ओवा, बेसन, ज्वारीचे पीठ, दही, तांदळाचे पीठ, पाणी, तेल
कृती१. चांगली छान ताजी काकडी धुऊन घ्या.(Want to eat Shraddha Kapoor's favorite cucumber bhakri? Get this delicious recipe) काकडी वापरण्याआधी एकदा एक तुकडा खाऊन बघायची कडू आहे का नाही ते तपासून मगच पुढे वापरायची. काकडीची सालं सोलून घ्या. काकडी मस्त बारीक किसून घ्या.
२. हिरव्या मिरचीची पेस्ट करुन घ्या. किंवा मस्त ठेचून घ्या. बारीक चिरली तरी चालेल. आलं किसून घ्या. कोथिंबीरही बारीक चिरुन घ्या.
३. एका परातीमध्ये ज्वारीचे पीठ घ्या. त्यामध्ये बेसनाचे पीठ घाला. तसेच तांदळाचे पिठही घ्या. ज्वारीचे पीठ जर वाटीभर वापरत असाल तर बेसनही वाटीभर वापरा. तांदळाचे पिठही वाटीभर घ्या. सम प्रमाणात पीठ वापरा.
४. त्यामध्ये चमचाभर जिरे घाला. चमचाभर धणे घाला. तसेच थोडे पांढरे तीळ घाला. हातावर ओवा घ्या तो व्यवस्थित मळा आणि मग पिठामध्ये टाका. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तसेच किसलेले आले घाला. हिरवी मिरची घाला. चवीपुरते मीठ घाला. सगळे छान एकजीव करुन घ्या. त्यामध्ये वाटी भर दही घाला. चांगले गोड दही वापरा. दह्यामध्ये पीठ छान मळून घ्या. भाकरीसाठी जसे पीठ मळता त्यापेक्षा थोडेसे जास्त पातळ पीठ मळा. गरजेनुसार पाणी वापरा.
५. पोलपाटावर कॉटनचा ओला फडका घ्या. त्यावर भाकरी थापून घ्या. नंतर तव्यावर थोडे तेल लावा आणि थापलेली भाकरी तव्यावर टाका. काही जण थेट तव्यावरच भाकरी थापतात. मस्त खमंग होईपर्यंत परता गरमागरम भाकरी चटणीबरोबर खा.