Join us  

हिवाळ्यात गरमागरम सिंधी कढी खाऊन तर पाहा, तोंडाला चव येईल असा भन्नाट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 3:24 PM

Watch: How To Make Delicious Sindhi Kadhi At Home : मुलं भाज्या खात नसतील पण सिंधी कढी करुन द्या, वाटी-वाटी कढी संपेल चटकन

आपल्या भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कला, कल्चर यासह खाद्यसंस्कृती देखील सर्वदूर प्रचलित आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत येथील लोकांची विविध खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते. आपण पंजाबी, महाराष्ट्रीयन कढी खाऊन पाहिलीच असेल पण, कधी सिंधी कढी (Sindhi Kadhi) ट्राय करून पाहिली आहे का?

सिंधी लोकांचा खवय्यावर्ग मोठा आहे. त्यांची दाल पकवान ही रेसिपी खूप फेमस आहे. यासह ते सिंधी कढी आवर्जून तयार करून खातात. जर आपल्याला पंजाबी, महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी खाऊन कंटाळा आला असेल, किंवा कढी या प्रकारामध्ये युनिक काहीतरी तयार करून खायचं असेल तर, नक्की एकदा सिंधी कढी करून खा (Cooking Tips). भाज्यांनी भरपूर, शिवाय आरोग्यासाठी उत्तम ही कढी कशी तयार करायची पाहूयात.

सिंधी कढी करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

मोहरी

मेथी दाणे

बेसन

पाणी

कडीपत्ता

कडधान्य-पालकाची भाजी नेहमीचीच, करून पाहा पौष्टीक कुरकुरीत डोसा, ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज-ना इनोचा वापर..

लाल तिखट

हळद

हिरवी मिरची

टोमॅटो प्युरी

बटाटा

शेवग्याची शेंग

फरसबी

भेंडी

वांगी

कोकम

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका पातेल्यात ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, एक चमचा मेथी दाणे, एक चमचा मोहरी घालून मिक्स करा. जिरं-मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक कप बेसन घालून चमच्याने ढवळत राहा. बेसनाचा रंग बदलल्यानंतर त्यात २ ग्लास पाणी घाला, व चमच्याने एका बाजूने ढवळत राहा. नंतर त्यात ४ ते ५ कडीपत्त्याची पानं, एक चमचा लाल तिखट, एक चमचा हळद, १ ते २ उभी चिरलेली हिरवी मिरची आणि एक वाटी टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा.

बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

मध्यम आचेवर गॅस ठेवा. उकळी आल्यानंतर त्यात एक वाटी चौकोनी काप केलेला बटाटा, शेवग्याची शेंग, फरसबी घालून मिक्स करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. दुसरीकडे पॅनमध्ये २ चमचा तेल घाला. नंतर त्यात ७ ते ८ उभी चिरलेली भेंडी आणि ३ ते ४ चिरलेलं वांगी घालून भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर या भेंडी आणि वांगं बेसनाच्या तयार मिश्रणात घालून मिक्स करा. शेवटी त्यात ३ ते ४ कोकम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून २ मिनिटांसाठी भाज्या शिजवून घ्या. अशा प्रकारे सिंधी कढी खाण्यासाठी रेडी. आपण ही कढी भात, चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स