बाजारात फ्रेश मिल्क क्रिम किंवा साजूक तूप खूपच महाग विकले जाते. भाजीची चव वाढवण्याासाठी किंवा एखादा गोड पदार्थ बनवण्यासाठी दुधाच्या क्रिमचा वापर केला जातो. (Ways to Make Cream from Milk) पण जर तुम्ही घरीच दूध आणत असाल तर फ्रेश क्रिम विकत घेण्यासाठी किंवा रवाळ साजूक तूप विकत घेण्यासाठी वेगळा खर्च करण्याची काही गरज नाही. (Easy Ways to Make Cream from Milk)
दूध व्यवस्थित गरम करून तुम्ही रोज फ्रेश क्रिम मिळवू शकता. ((Dhudhavar ghatt say yenyasathi kay karave) घरच्याघरी दूधाची साय बाजूला काढून तुम्ही फ्रेश क्रिम मिळवू शकता. दूधावर घट्ट साय येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. दुधावर घट्ट साय येण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to make fresh cream at home instantly follow these tricks)
दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती
दूध उकळण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर दूध जास्त व्यवस्थित सेट करता येते आणि जाड मलई येते. जेव्हा दूध व्यवस्थित गरम होईल तेव्हा थोड्यावेळासाठी असेच ठेवून द्या. ज्यामुळे जाड मलई येईल. फ्रिजमधून काढल्यानंतर लगेच दूध गरम करायला ठेवल्यास ते फार थंड असते. हे टाळण्यासाठी मध्यम आचेवर दूध उकळण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटं शिजवा.
१ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी
सगळ्यात आधी करा हा सोपा उपाय
दूधातून मलई काढण्यासाठी सगळ्यात आधी मंद आचेवर दूध गरम करा. दूध कधीच उच्च आचेवर गरम करू नका. याव्यतिरिक्त दूध फ्रिजमधून काढून सरळ कधीच गरम करू नका. फ्रिजमधून दूध बाहेर काढल्यानंतर थोड्यावेळानंतर गरम करा.
दूध झाकून ठेवण्यासाठी काय वापरावे?
दूध कमीत कमी १० ते १५ मिनिटांसाठी मंच आचेवर उकळवल्यानंतर प्लेट, सुती कापड किंवा चाळणीने झाकून ठेवा. रूम टेम्परेचरवर दूध थंड होण्यासाठी सोडून द्या. दूध जास्त ढवळू नका. दूध जास्तीत जास्त स्थिर राहील असे पाहा.
फ्रिजमध्ये दूध ठेवा
२ ते ३ तास दूध फ्रिजमध्ये ठेवा. यापेक्षा जास्तवेळही तुम्ही दूध फ्रिजमध्य ठेवू शकता. दूध जितका जास्त वेळ थंड होईल तितका वेळ दूधाला सेट होण्यासाठी मिळेल आणि दुधावर जाडसर मलईचा थर येईल.
अचानक दूध फाटलं तर ५ मिनिटांत करा हलवाईस्टाईल सुपर सॉफ्ट बर्फी; तोंडात टाकताच विरळेल
मातीच्या भांड्यात दूध ठेवा
फ्रिजऐवजी तुम्ही दूध उकळून झाल्यानंतर ते मातीच्या भांड्यात स्टोअर करून ठेवू शकता. मातीच्या संपर्कात आल्याने दूधाची मलई जास्त घट्ट येते. मातीच्या भांड्यात दूध ठेवल्यानंतर व्यवस्थित झाकून ठेवा. दूध उकळत असताना १ ते २ वेळा चमच्याने ढवळा. यामुळे दुध घट्ट होईल. पातेलील खाली थोडं पाणी घालायला विसरू नका. नंतर दूध घाला. दूध गरम झाल्यानंतर त्यावर जाळीचे झाकण ठेवा. यामुळे साय चांगली येईल.