Lokmat Sakhi >Food > वीकेंड स्पेशल : घरच्याघरी करा चीजी बन्स पिझ्झा, रविवारी करा यादगार - सोपी रेसिपी....

वीकेंड स्पेशल : घरच्याघरी करा चीजी बन्स पिझ्झा, रविवारी करा यादगार - सोपी रेसिपी....

Weekend Special : Bun Pizza Recipe : मैद्यापासून तयार केलेला पिझ्झा बेस न वापरता आपण त्या जागी गोल आकाराच्या बन्सचा वापर करून पिझ्झा बन्स तयार करू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 04:32 PM2023-01-21T16:32:33+5:302023-01-21T16:38:12+5:30

Weekend Special : Bun Pizza Recipe : मैद्यापासून तयार केलेला पिझ्झा बेस न वापरता आपण त्या जागी गोल आकाराच्या बन्सचा वापर करून पिझ्झा बन्स तयार करू शकतो.

Weekend Special: Make Cheesy Buns Pizza at Home, Make Sundays Memorable - Easy Recipe.... | वीकेंड स्पेशल : घरच्याघरी करा चीजी बन्स पिझ्झा, रविवारी करा यादगार - सोपी रेसिपी....

वीकेंड स्पेशल : घरच्याघरी करा चीजी बन्स पिझ्झा, रविवारी करा यादगार - सोपी रेसिपी....

पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पिझ्झा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला आपसूकच पाणी सुटत. वेगवेगळे व्हेजिटेबल आणि चमचमीत सॉस यांपासून बनलेला पिझ्झा खाण सगळेच पसंत करतात. मैद्याचा वापर करून तयार केलेला गोल जाडसर पिझ्झा बेस वापरून आपण पिझ्झा तयार करतो. संध्याकाळच्या नाश्त्याला आपल्याला असच चटपटीत खावंसं वाटत. याच पिझ्झा टॉपिंग्स आणि सॉसचा वापर करून आपण एक नवीन वेगळा चटकदार पदार्थ तयार करू शकतो. मैद्यापासून तयार केलेला पिझ्झा बेस न वापरता आपण त्या जागी गोल आकाराच्या बन्सचा वापर करू शकतो. हे पिझ्झा बन्स झटपट बनतात आणि खायला अतिशय चटकदार लागतात(Weekend Special : Bun Pizza Recipe).

साहित्य - 

१. टोमॅटो - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
२. ढोबळी मिरची - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
३. कांदा - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
४. मक्याचे दाणे - २ टेबलस्पून (उकळवून घेतलेले)
५. मोझरेला चीज - २ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेले)
६. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून 
७. ओरिगॅनो - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार 
९. गोल आकारातील बन - ४ ते ५ 
१०. चीज स्लाईस - ४ ते ५ 
११. पिझ्झा सॉस - १/२ टेबलस्पून

सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरून पिझ्झा बन्स कसे तयार करायचे याचे साहित्य काय व कृती कशी करावे हे समजावून सांगितले आहे.  

   


कृती - 

१. एक मोठा बाऊल घेऊन त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, ढोबळी मिरची, कांदा, मक्याचे दाणे, मोझरेला चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असे सर्व साहित्य एकत्रित करून घ्या. 
२. आता या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि पिझ्झा सॉस घालून घ्यावे. हे व्हेजिटेबल्सचे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवून द्यावे. 
३. आता गोल आकारातील पाव म्हणजेच बन घेऊन त्याला बरोबर मधोमध गोल होल पाडून घ्यावा.
४. बनच्या मधोमध होल करताना कुकीज कटरच्या मदतीने किंवा ग्लासच्या कडांच्या मदतीने गोलाकार आकार काढून घ्या.  
५. आता या बनच्यामध्ये तयार झालेल्या होलमध्ये एक चीज स्लाईस व्यवस्थित अंथरून घ्या. 
६. त्यानंतर आपण बनवून घेतलेलं व्हेजिटेबल मिश्रण त्यात चमच्याच्या मदतीने घालून घ्या.   
७. मग त्यावर आवडीनुसार किसून घेतलेले चीज घाला. 
८. त्यानंतर एका डिशमध्ये हे बन्स ठेवून मग ती डिश गरम तव्यात ठेवून वरून झाकण लावावे. हे बन्स मायक्रोव्हेव्हमध्ये चीज मेल्ट होईपर्यंत ठेवू शकता.  
९. किमान ७ ते ८ मिनिटे ठेवल्यानंतर त्यावरील चीज वितळू लागेल. 

आता हे पिझ्झा बन्स खाण्यासाठी तयार आहेत. खाण्यासाठी तयार झालेले पिझ्झा बन्स आपण टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता.

Web Title: Weekend Special: Make Cheesy Buns Pizza at Home, Make Sundays Memorable - Easy Recipe....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न