Join us  

Weight loss Drink: डिटॉक्स, वेटलॉससाठी परफेक्ट ड्रिंक! काकडीची खास स्मूदी.. बघा कशी करायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 2:26 PM

Weight Loss Tips: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर हे एक खास ड्रिंक (perfect drink for weight loss) तुम्ही घेतलंच पाहिजे.. नियमितपणे १ ग्लास प्या आणि भरपूर फायदे मिळवा. 

ठळक मुद्देकाकडीची ही खास पद्धतीने तयार केलेली स्मूदी नेहमीच करा.. वेटलॉससाठी खूपच फायद्याचे ठरेल.

शरीरात नियमितपणे विषारी द्रव्ये तयार होत असतात. हे सगळे टॉक्झिन्स नियमितपणे शरीराबाहेर फेकले जाणे अत्यावश्यक असते. आहारातून पण आपण असे काही पदार्थ घेत असतो, जे पदार्थ विषारी द्रव्ये (detox drinks) शरीराबाहेर टाकायला मदत करतात आणि शरीर स्वच्छ ठेवतात. त्या पदार्थांना डिटॉक्स डाएट म्हणून ओळखलं जातं. बॉडी डिटॉक्स (body detox) करण्यासाठी पाण्याची भूमिका अर्थातच सगळ्यात मोठी आहे. पण डिटॉक्स डाएट (detox diet) म्हणून जे काही पदार्थ प्रामुख्याने ओळखले जातात, त्यापैकी एक म्हणजे काकडी. म्हणूनच तर काकडीची ही खास पद्धतीने तयार केलेली स्मूदी नेहमीच करा.. वेटलॉससाठी खूपच फायद्याचे ठरेल.

 

काकडी स्मूदी रेसिपी (Cucumber smoothie recipe)- कुकुंबर स्मूदी रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. त्यामुळे सकाळच्या धावपळीत नाश्तासोबत ही कुकुंबर स्मुदी तुम्ही अगदीच झटपट करू शकता. - स्मूदी करण्यासाठी आपल्याला एक फ्रेश काकडी, थोडीशी कोथिंबीर, मीठ, चाटमसाला, मिरेपूड आणि बर्फ असं एवढं सामान लागणार आहे. - यासाठी सगळ्यात आधी काकडीची सालं काढून घ्या आणि त्याचे तुकडे करा. काकडीचे तुकडे, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या. - ही पेस्ट एका ग्लासमध्ये टाका. त्यात थोडं पाणी टाका. चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि मीरेपूड टाका. - बर्फाचा एक तुकडा टाका आणि थंडगार स्मूदी सकाळच्या वेळी प्या. 

 

कुकुंबर स्मूदी पिण्याचे फायदे (Benefits of Cucumber smoothie)- काकडी हे अतिशय उत्तम सॅलाड मानलं जातं. त्यामुळे तुमच्य रोजच्या जेवणातंही जेवणाचा आठवा भाग हा काकडी असावा, असं काही आहातज्ज्ञ सांगतात.- काकडीमध्ये असणारे काही घटक शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे काकडी हे एक उत्तम डिटॉक्स डाएट म्हणून ओळखलं जातं.

- काकडीमध्ये ९० टक्के पाणी असतं. त्यामुळे काकडी खाल्ल्यास डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. शिवाय त्यामुळेच भरपूर वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे इतर काही खाण्याची इच्छा होत नाही आणि आपोआपच अति खाण्यावर नियंत्रण येते. - काकडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनासाठी काकडी अतिशय उत्तम असते.- काकडीमध्ये कॅलरीज, फॅट्स आणि कोलेस्टरॉल नसल्याने काकडी वेटलॉससाठी निश्चितच फायदेशीर ठरते. - व्हिटॅमिन के, सी, बी ६, रायबफ्लेविन, फोलेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, झिंक 

 

टॅग्स :अन्नपाककृतीवेट लॉस टिप्सआरोग्यकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.