दिवाळी (Diwali 2024) म्हटलं रोषणाई, शॉपिंग आणि खूप सारं खाणं येतं. दिवाळी हा ६ दिवसांचा असतो (Makhana Kheer). ज्यात लक्ष्मी पूजन प्रत्येक जण करतो. लक्ष्मी पूजनाला (Laxmi Poojan) नैवैद्य म्हणून आपण फराळ ठेवतो तर काही जण मखाणा खीरही ठेवतात. मखाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मखणा हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो मजबूत हाडे राखण्यासाठी आवश्यक आहे.
मखाणामधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कॅल्शियम चयापचय नियंत्रित करण्यास मदत करतात. यासह यात फॉस्फरस आढळते. यात प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते. जे वेट लॉससाठीही मदत करते. आपण लक्ष्मी पूजनाच्यानिमित्ताने घरात मखाणा खीर तयार करू शकता. पण मखाणा खीर नेमकी करायची कशी? पाहा सोपी रेसिपी(Weight Loss Makhana Kheer | Healthy Home Made Recipe In laxmi Poojan Diwali 2024).
मखाणा खीर करण्यासाठी लागणारं साहित्य
मखाणा
तूप
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
दूध
गुळ पावडर
केसर
ड्रायफ्रुट्स
कृती
सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप मखाणा घाला. नंतर एक चमचा तूप घाला. दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात मखाणा घाला. आणि त्याची पावडर तयार करा. तयार पावडर उकळलेल्या दुधात घालून मिक्स करा. आता एका वाटीमध्ये दूध घ्या. त्यात केसर घाला. केसर दूध खीरीमध्ये घालून मिक्स करा. नंतर त्यात एक वाटी गूळ पावडर, एक वाटी चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ मिनिटांसाठी ठेवा. नंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे चविष्ट मखाणा खीर खाण्यासाठी रेडी.