दररोज सकाळी नाश्त्याला काय करावे असा प्रश्न पडतो. पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडे, हे पदार्थ नाश्त्यामध्ये खाल्ले जातात. पण वेट लॉसदरम्यान, काही लोकं हे पदार्थ स्किप करतात. जर आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये चविष्ट पण हेल्दी पदार्थ खायचे असतील तर, वेट लॉस डोसा ही रेसिपी ट्राय करून पाहा.
वेट लॉस डोसा हा पदार्थ कमी साहित्यात तयार होते. हा डोसा करण्यासाठी डाळ - तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही. एक कप भिजलेल्या चण्याच्या डाळीपासून हे डोसे तयार होतात. चण्याच्या सेवनाने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. १०० ग्रॅम चणे खाल्ल्याने १९ ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळते. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले वाटते. वेट लॉस जर्नीमध्ये चविष्ट व हेल्दी पदार्थ खायचे असतील तर, वेट लॉस डोसा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Weight loss Recipes | Chana Dosa | High Protein Breakfast).
वेट लॉस डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
१ वाटी भिजलेले चणे
एक वाटी रवा
३ चमचे दही
३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
मीठ
२ चमचे तांदळाची करा इन्स्टंट खीर, १५ मिनिटांत मस्त गोड खिर तय्यार, चवीलाही बेस्ट
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप भिजलेले चणे घ्या, त्यात एक वाटी रवा, ३ चमचे दही, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व पाणी घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये पेस्ट काढून घ्या. १५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.
कोथिंबीर २ दिवसात सुकून खराब होते? ४ सोप्या ट्रिक्स, कोथिंबीर आठवडाभर टिकेल - राहील फ्रेश
आता दुसरीकडे नॉन - स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा, त्यावर थोडे तेल लावून चमच्याने पसरवा, आता तव्यावर डोश्याचं बॅटर पसरवा. व दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्या. अशा प्रकारे वेट लॉस डोसा खाण्यासाठी रेडी.