Join us  

वेडे की काय, आवरा रे! चक्क 'पाणीपुरी शेक' पाहून नेटकरी चिडून म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 12:45 PM

Social viral: आमच्या लाडक्या पाणीपुरीवर अजून किती अत्याचार करणार आहात? आता तरी असले प्रयोग थांबवा रे.. असं म्हणत पाणीपुरी लव्हर्स (panipuri lovers) या एका माणसावर भलतेच नाराज झाले आहेत.. बघा याचं नेमकं कारण (gol gappe shake) काय ते.. 

ठळक मुद्देया लोकांनी खुमासदार, कुरकुरीत पाणीपुरीची सगळी मजाच घालवून टाकली आहे, असं हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत.

पाणीपुरी म्हणजे अनेक खवय्यांचा जीव की प्राण.. स्वस्तात मस्त आणि अतिशय चवदार असं काहीतरी खायचं असेल, तर पाणीपुरीसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही, असं पाणीपुरी लव्हर्सचं (love for panipuri) ठाम मत आहे.. तिखट- आंबट- गोड चवीची पाणीपुरी एकदा तोंडात टाकली आणि कुरुम कुरुम करत तिचा आस्वाद घेतला की मन आणि जीभ दोन्हीही तृप्त होतात.. पण या लोकांनी मात्र अशा खुमासदार कुरकुरीत पाणीपुरीची सगळी मजाच घालवून टाकली आहे, असं हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत. (how to make panipuri or golgappe shake?) 

 

weird food cominations करायचे आणि त्याचे व्हिडिओ करून सोशल मिडियावर (social viral) टाकायचे, असा जबरदस्त ट्रेण्ड सध्या सुरू आहे.. यातूनच तर जन्म झाला आहे या पाणीपुरी शेक चा... थंडगार शेक आणि तो ही पाणीपुरीचा ही कल्पनाच आता अनेक लोकांना आवडत, रुचत नाहीये.. म्हणूनच तर हा अतरंगी, विचित्र पदार्थ बनविणाऱ्या या विक्रेत्यावर नेटकरी जाम भडकले आहेत.. पाणीपुरीचं आईस्क्रीम काय, मग पाणीपुरीची मॅगी काय.. आणि आता तर चक्क पाणीपुरीचा शेक... हे पाहूनच अनेक लोकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे.

 

पाणीपुरी शेकची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या foodie_blest या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. 'Kya lagta hai kaisa hoga?' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून 'नको यार हे आम्हाला दाखवू पण नका... ' असं म्हणत पाणीपुरी लव्हर्स या पदार्थाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. 

 

हा गोलगप्पे शेक बनविण्यासाठी सगळ्यात आधी त्या शेफने एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यात दोन- तीन पुऱ्या टाकल्या. मग बटाटा आणि कांद्याचं सारण टाकलं. त्यानंतर चिंचेची गोड चटणी, चिंच आणि पुदिन्याचं तिखट पाणी असं सगळं टाकलं.. त्यानंतर चक्क मिक्सरमधून या सगळ्या पदार्थांचा ज्यूस बनवून घेतला आणि तो ग्लासमध्ये टाकून सर्व्ह केला. वरून पुऱ्यांचा चुरा आणि एक गोल कडक पुरी ठेवून या पाणीपुरी शेकचं गार्निशिंग केलं आणि खवय्यांना तो चाखायला दिला.. आहे की नाही हा विचित्र प्रकार? आता हा शेक पाहून जर तुम्हाला प्यावा वाटत असेल तर ट्राय करून बघा ही रेसिपी. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.सोशल व्हायरलइन्स्टाग्राम