आइस्क्रीम आणि दाल मखनी (ice cream and dal makhani) हे दोन पदार्थ अतिशय सुंदर, चवदार असून त्यांचा त्यांचा स्वत:चा असा एक वेगळाच फॅन क्लब आहे. दाल मखनी लव्हर्सला आइस्क्रीम (ice cream lovers) आवडतं. आणि आइस्क्रीम आवडणारेही दाल मखनी एन्जॉय करतात. पण म्हणून काही कोणी दाल मखनी आणि आइस्क्रीम हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाऊ शकत नाही (Weird Food Combination).. किंबहूना असा विचारही डोक्यात येत नाही. पण असंच काहीसं एका जणाने करून दाखवलं आहे (dal makhani ice cream roll) आणि म्हणूनच खाद्यपदार्थांसोबत केलेला हा विचित्र प्रयोग सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे.
रोज तेच ते जेवायला दिलं तर कुणीही कंटाळतोच. त्यामुळे शक्यतो घरातल्या महिला पण स्वयंपाकात काहीतरी नाविण्य, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. रेसिपीमध्ये थोडासा बदल केला जातो, जेणेकरून मग पदार्थाची चवही नेहमीपेक्षा वेगळी होते. पण इथे तर काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काहीतरी भलताच प्रयोग करण्यात आला आहे. हे दाल मखनी फ्लेवरचं आइस्क्रीम नेमकं कसं तयार करण्यात आलं आहे, हे बघणंही खूपच रंजक आहे.
I am all for eat what you like, but does anybody actually like this?
— Samarpita | Editor - Content Writer - Coach (@samarpitadotin) July 25, 2022
Dal Makhni Ice cream roll? pic.twitter.com/o5CHnVpfhu
दाल मखनी आइस्क्रीम रोलचा हा व्हिडिओ @samarpitadotin या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. हा असा पदार्थ कुणाला आवडू शकतो? अशा अर्थाची कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आली आहे. हे असं विचित्र प्रकारचं आइस्क्रीम बनविण्यासाठी शेफने सगळ्यात आधी दाल मखनी एका कुलिंग पॅनवर टाकली. त्यानंतर त्यावर प्लेन आइस्क्रीम टाकलं.
कुल्हड चहा नंतर आता आलाय कुल्हड पिझ्झा! आता त्याला पिझ्झा म्हणणार की आणखी काही? बघा...
त्यानंतर हे दोन्ही पदार्थ घोटून घोटून अगदी एकजीव करून घेतले. नंतर तो तयार झालेला पदार्थ पुन्हा एकदा पॅनवर पसरवला. त्यावर पुन्हा एकदा दाल मखनीचा एक थर पसरवला आणि त्याचे रोल केले. हे रोल डिशमध्ये सर्व्ह करताना त्यासोबत चक्क कांदा आणि चपातीचा एक तुकडाही देण्यात आला.. म्हणजे आता हे आइस्क्रीम खा आणि त्यासोबत कांदा आणि पोळी तोंडी लावा, असंच हा शेफ सांगतो आहे.