Join us  

भलताच प्रयोग! खाऊन पाहिली का कधी मॅगी बिर्याणी? ही व्हायरल रेसिपी पाहून नेटिझन्स म्हणाले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 2:33 PM

Viral Recipe Of Maggi Biryani: मॅगी घालून केलेली बिर्याणी ही कल्पनाही अनेक खवय्यांना आवडलेली नाही... तुम्हीही या पदार्थाची रेसिपी पाहा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं... (Weird food combination)

ठळक मुद्देकाही खवय्यांना हा पदार्थ अतिशय आवडला असून त्यांना मॅगी बिर्याणीची चव चाखून पाहायची आहे. 

मॅगी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. अगदी सकाळी नाश्त्यापासून ते मध्यरात्री कधी तरी लागलेली थोडीशी भूक भागविण्यापर्यंत कधीही सहज चालून जाणारा हा पदार्थ. रसनातृप्ती करणारा अगदी स्वस्तात मस्त पदार्थ म्हणजे मॅगी. म्हणूनच तर मॅगीवेडे खूप खवय्ये (food lover) आहेत. मॅगी करण्याची प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते. पण इथे तर मॅगीसोबत एक भलताच प्रयोग करण्यात आला आहे. चक्क मॅगी बिर्याणी नावाचा भन्नाट पदार्थ शोधून  काढला असून तो एका हॉटेलमध्ये खवय्यांना विकण्यात येतोय (Viral recipe of maggi biryani). मॅगी बिर्याणी नावाचा हा भलताच पदार्थ नेमका कुठे मिळतो ते पाहा...(Weird food combination)

 

मॅगी बिर्याणी हा असाही एक पदार्थ असतो, हे ऐकल्यावर काही बिर्याणी प्रेमी आणि मॅगी प्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांना मॅगी आणि बिर्याणी या दोन पदार्थांचं असं विचित्र कॉम्बिनेशन अजिबात आवडलेलं नाही.

नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

त्यामुळे त्यांनी "Ye khane se acha toh mai suryavansham vaali kheer kha lu..." अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर काही खवय्यांना हा पदार्थ अतिशय आवडला असून त्यांना मॅगी बिर्याणीची चव चाखून पाहायची आहे. 

 

हा पदार्थ करण्यासाठी तांदळाऐवजी मॅगी वापरण्यात आली आहे. ज्याप्रमाणे आपण बिर्याणी करतो, त्याचप्रमाणे सगळी रेसिपी करायची. फक्त तांदळाऐवजी मॅगी वापरायची.

उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

मॅगी मसाला आणि बिर्याणीच्या मसाल्यांचा स्वाद यामुळे ही रेसिपी छान होत असणार, असं वाटतं. घरी ट्राय करून पाहायला ही रेसिपी सोपी आहे. तुम्हाला या अस्सल मॅगी बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ती मुंबईत माटुंग्याला मिळते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मॅगीमॅगी