जेवताना कच्चा कांदा खाण्याची सवय अनेकांना असते. तर काहींना कांद्याचा वासही सहन होत नाही. कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचते. प्रत्येकाला माहीत आहे की कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. (Side Effects of Onion) तीच स्थिती कांद्याची आहे. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर वाढण्यासह पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. चला तर मग जाणून घेऊया याशिवाय इतर कोणते तोटे असू शकतात. (Do Onions Have Any Downsides or Side Effects)
1) पचनाचे त्रास
कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज जास्त असते. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे काहींना चांगले पचत नाही. अशा स्थितीत अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
फक्त २ मिनिटात गायब होईल छातीतली जळजळ अन् अॅसिडिटी ; 5 साधे उपाय, ताबडतोब मिळेल आराम
2) डायबिटीक रुग्णांना त्रास
कच्चा कांदा रक्तातील साखरेसाठीही फायदेशीर नाही. मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही गोष्ट जपून घ्यावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
३) छातीत जळजळ
जर तुम्हीही कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या, कारण यामुळे तुमची समस्या वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणजेच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.
रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब
४) तोंडाचा वास
जास्त कांदा खाल्ल्यानं तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रारही तुम्हाला पाहायला मिळेल. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा, जरी तुम्ही कांदा खाल्ला तरी पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.