Join us  

भाजीत मीठ चूकून जास्त पडलं तर काय कराल? २ सोपे उपाय - सुकी आणि रसभाजी होईल परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2023 1:24 PM

How To Balance Excess Salt In Dishes : दोन सोप्या टीप्स वापरून ग्रेव्ही व सुक्या भाजीतील किंवा इतर पदार्थांतील जास्तीचे मीठ कमी करु शकतो.

अन्नाला चव यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी आपण रोजच्या जेवणात मिठाचा वापर करतो. मीठ हा स्वयंपाक घरांतील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. मिठाचा वापर केल्याने अन्नपदार्थांची चव वाढते. मिठाशिवाय अन्नपदार्थाला चव येणं शक्यच नाही. काहीवेळा कामाच्या घाई - गडबडीत आपल्या हातून जास्तीचे मीठ अन्नपदार्थांत पडते. अशापरिस्थिती, आपला कितीही आवडता पदार्थ असला तरी मीठ जास्त झाल्यामुळे आपल्याला तो पदार्थ खावासा वाटत नाही.

खूप वेळा जेवणात मीठ कमी असताना आपण वरून मीठ घालतो जेणेकरून जेवणाची चव टिकून राहते. काही लोक असे असतात ज्यांना जेवणात मिठाचे भान नसते त्यामुळे ते काहीवेळा जास्तीचे मीठ घालतात. गरजेपेक्षा थोडे जरी मीठ जास्त झाले तरी सगळ्या अन्नपदार्थांची चव बिघडते. अशावेळी हा पदार्थ टाकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो. परंतु चिंता करू नका, दोन सोप्या टीप्स वापरून आपण ग्रेव्ही आणि सुक्या भाजीतील किंवा इतर पदार्थांतील जास्तीचे मीठ कमी करुन, बिघडलेला पदार्थ चटकन सुधारु शकतो(How To Balance Excess Salt In Dishes).

सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून रस्सेदार भाज्या, डाळ आणि सुक्या भाजीतील जास्तीचे मीठ कमी करून तो पदार्थ कसा रुचकर बनवायचा याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

१. रस्सेदार, ग्रेव्ही भाजीतील मीठ कमी करण्यासाठी उपाय :- 

१. सर्वप्रथम कणिक मळून त्याचे लहान लहान गोळे करून घ्यावेत. २. आता ज्या रस्सेदार भाजीत किंवा ग्रेव्हीत मीठ जास्त झाले आहेत तो अन्नपदार्थ गॅसवर गरम करत ठेवावा. ३. आता गरम झालेल्या या भाजीत किंवा ग्रेव्हीत हे तयार कणकेचे लहान - लहान गोळे सोडावेत. ४. थोडावेळ ते कणकेचे गोळे भाजीत तसेच ठेवून गॅस मंद आचेवर ठेवावा.  ५. कणकेचे गोळे रस्सेदार भाजीतील जास्तीचे मीठ लगेच शोषून घेईल व यामुळे रस्सेदार भाजीतील जास्तीचे मीठ कमी होईल. 

२. सुक्या भाजीतील जास्तीचे मीठ कमी करण्यासाठीचे उपाय :- 

१. सुक्या भाजीतील जास्तीचे मीठ कमी करण्यासाठी त्यात दुसरा आंबट पदार्थ मिसळावा. २. सुक्या भाजीतील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी लिंबाचा रस, दही, टोमॅटोची प्युरी असे मिक्स करू शकता. ३. कोणत्याही मीठ जास्त झालेल्या सुक्या भाजीत आंबट पदार्थ मिक्स केल्यास त्याचा खारटपणा कमी होतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स