Ajwain water and Black Pepper : भरपूर लोक ओवा जेवण झाल्यावर मुखवास म्हणून खातात. तर काही लोक पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी दूर करण्यासाठी ओव्याचं पाणी पितात. ओव्याचं पाणी आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतं. पण अनेकांना ओव्याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. ओव्याच्या पाण्यात काळी मिरे पावडर टाकून प्यायल्यानं काय होतं हेही अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊया.
पचनक्रिया सुधारते
ओवा आणि काळी मिरे दोन्ही गोष्टी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. ओव्यामध्ये थायमोल आणि काळी मिऱ्यांमध्ये पायपरिन असतं, जे पचनक्रिया सुधारतं.
इम्यूनिटी बूस्ट होते
काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशात वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो.
बॉडी डिटॉक्स
ओवा आणि काळी मिरीच्या मिश्रणानं शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. ज्यामुळे नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स होतं.
वजन कमी होतं
ओवा आणि काळी मिरी दोन्ही गोष्टी शरीरातील चरबी कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात. ओव्यामध्ये फायबर असतं आणि काळी मिरीमधील पिपेरीन वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
ब्लड शुगर कंट्रोल
ओवा आणि काळी मिरीच्या पाण्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळेच डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे पाणी फायदेशीर मानलं जातं.
जॉइंट्समधील दुखणं होईल दूर
काळी मिरीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात जे जॉइंट्स दुखणं आणि सूज कमी करण्यास मदत करतात.