Join us  

१ महिना भात न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, तज्ज्ञ सांगतात भात न खाण्याचे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:13 PM

what will happen to your body without white rice for a month : जास्त भात खाल्ल्याने पोट सुटणं, मसल्स कमी फॅट्स जास्त वाढणं अशा समस्या जाणवतात. 

काही लोकांना भात खाण्याची इतकी  सवय असते की  ताटात भात घेतल्याशिवाय त्यांना जेवल्यासारखं वाटतंच नाही.  पण जास्त भात खाणं आणि इतर पदार्थ वगळून फक्त भातच खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.  जास्त भात खाल्ल्याने पोट सुटणं, मसल्स कमी फॅट्स जास्त वाढणं अशा समस्या जाणवतात. (What happens to your body if you do not eat rice for a month) वजन कमी करण्यासाठी भरपूर लोक रात्रीच्यावेळी भात खाणं टाळतात तर काहीजण ब्राऊन राईस खातात.

जास्त भात खाल्ल्याने शरीराच्या इतर समस्या वाढतात जसं की शरीरातील कार्ब्सचे प्रमाण वाढणे, जास्त झोप येणं, याव्यतिरिक्त भात खाल्ल्याने वजनही वाढू शकतं. जास्त वजन वाढल्यास हृदयाच्या आजारांचा धोका असतो. महिनाभर भात न खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊ. (This is what will happen to your body without white rice for a month)

एका हिंदी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार  श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या पोषण विभागाच्या प्रमुख प्रिया परमा यांनी सांगितले की, एक महिन्यासाठी भात सोडल्याने वजन कमी होण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते कारण त्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात.

एक महिना भात खाणं सोडल्यानंतर तब्येतीवर काय परिणाम होईल

जर तुम्ही एका महिन्यासाठी भात खाणं सोडलं तर आधीपेक्षा जास्त एक्टिव्ह राहाल. याशिवाय सुस्ती, जास्त झोप येणार नाही. शरीरात बदल झालेला जाणवले. तुम्ही जास्त एक्टिव्ह राहून व्यायाम कराल आणि ब्रेन जास्त अलर्ट राहून वेगाने काम करेल.

शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील

शरीरात जितके कार्ब्स असतात तितकंच ते पचवणं कठीण असतं.  अशा स्थितीत शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकते. म्हणून असे आजार असलेल्या रुग्णांना कमीत कमी भात खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून शरीरातील शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहिल.

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

 

वजन कमी करण्याचा बेस्ट उपाय

जर तुम्ही कमी वेळात वजन कमी करू इच्छित असाल तर एका महिन्यासाठी भात खाणं सोडा यामुळे तुम्हाला त्वरीत फरक जाणवेल. भात  खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि मेटाबॉलिझ्म स्लो होतो. ज्यामुळे बेली फॅट आणि लठ्ठपणा वाढू शकतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही एक महिना भात सोडल्यास भरत जाणवेल.

टॉयलेटमध्ये बराचवेळ बसून असता-पोट साफ होत नाही? 2 सोपे उपाय, पोटाचे त्रास टळतील

वोक्हार्ट रुग्णालयातील पोषणतज्ज्ञांनी सांगितले की, एका महिन्यासाठी तांदूळ पूर्णपणे सोडल्याने  वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील  कार्ब्सचे प्रमाणात नियंत्रणात राहते. याशिवाय रक्ताची साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स