Join us  

पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 3:54 PM

What Happens When you Reuse Cooking Oil? : उरलेल्या तळणाच्या तेलाचा पुन्हा वापर कसा करावा?

पावसाळा सुरु झाला की, आपण भजी, वडे, समोसे आवर्जून खातो. हे पदार्थ चवीला भन्नाट लागतात. पण अति प्रमाणात खाल्लात तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. बहुतांश लोक घरी तळणीचे पदार्थ करतात. भजी आणि वडे करतात. तळणीनंतर तेल उरते. मग उरलेल्या तेलाचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. उरलेलं तेल पुन्हा पदार्थासाठी वापरून खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

पण तेल फेकून देणंही उचित वाटत नाही. एकदा तेल वापरल्यानंतर ते पुन्हा गरम करून वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. परंतु, याचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकता. पण सर्वात आधी तेल स्वच्छ करणे गरजेचं आहे. वापरलेले तेल पुन्हा स्वच्छ करून वापरावे? पाहूयात(What Happens When you Reuse Cooking Oil?).

पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

- तळण्याचे तेल पुन्हा वापरण्यासाठी, ते चांगले फिल्टर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व जळलेले अन्नाचे कण फिल्टर होतील.

- तेल स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती गोष्टींचा वापर करू शकता. यासाठी पदार्थ तळून झाल्यानंतर, तेल थंड करण्यासाठी ठेवा. चहाच्या गाळणीने सर्वात आधी, तेल गाळून घ्या. नंतर गाळणीवर टिश्यू पेपर ठेवा. त्यात तेल गाळून घ्या. यामुळे तेलातील प्रत्येक कण निघून जाईल. आपण या तेलाचा वापर कणिक मळण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी करू शकता.

- तेल स्वच्छ करण्यासाठी आपण कॉर्न-स्टार्चचा वापर करू शकता. सर्वात आधी कढईमध्ये उरलेले तेल थोडे गरम करा. एक चमचा कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळा आणि या तेलात ओता. गॅस मंद आचेवर ठेवा. तेल जास्त गरम होऊ देऊ नका. काही वेळानंतर जेव्हा कॉर्न फ्लोअरच्या बॅटरला घट्टपणा येईल, तेव्हा तेलातील जळलेले घटक तेलात चिकटतील. नंतर ते बाहेर काढा, व तेल पुन्हा गाळणीने गाळून घ्या.

उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल

- आपण तेलातील काळेपणा साफ करण्यासाठी लिंबाचा देखील वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी तेल गरम करा. त्यात लिंबाचे ७ ते ८ तुकडे घाला. काही वेळानंतर सर्व जळलेले कण त्यावर चिकटलेले आपल्याला पाहायला मिळतील. नंतर गाळणीने तेल गाळून घ्या. 

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न