Lokmat Sakhi >Food > ९० टक्के लोकांना माहीत नसते नाश्त्याची योग्य वेळ; निरोगी राहण्यासाठी नाश्त्याचं टायमिंग-पाहा

९० टक्के लोकांना माहीत नसते नाश्त्याची योग्य वेळ; निरोगी राहण्यासाठी नाश्त्याचं टायमिंग-पाहा

What is Best Time for Breakfast : नाश्ता न केल्यानं रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. ब्लड प्रेशर, डायबिटीस यांसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. (90 percent of people do not know the right time for breakfast)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:10 PM2023-07-21T16:10:35+5:302023-07-21T16:44:44+5:30

What is Best Time for Breakfast : नाश्ता न केल्यानं रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. ब्लड प्रेशर, डायबिटीस यांसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. (90 percent of people do not know the right time for breakfast)

What is Best Time for Breakfast : 90 percent of people do not know the right time for breakfast | ९० टक्के लोकांना माहीत नसते नाश्त्याची योग्य वेळ; निरोगी राहण्यासाठी नाश्त्याचं टायमिंग-पाहा

९० टक्के लोकांना माहीत नसते नाश्त्याची योग्य वेळ; निरोगी राहण्यासाठी नाश्त्याचं टायमिंग-पाहा

सकाळाचा नाश्ता वेळेवर करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही या वेळेत नाश्ता केले नाही तर शरीराच्या कार्य पद्धतीवर परीणाम होतो. नाश्ता न केल्यानं शरीरातील एनर्जी लेव्हल कमी होते आणि दिवसभर थकवा, कमकुवतपणा जाणवतो. यामुळे मानसिक ताण आणि एंग्जायटी वाढते. (Health Tips) नाश्ता न केल्यानं रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. ब्लड प्रेशर, डायबिटीस यांसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. (90 percent of people do not know the right time for breakfast)

म्हणूनच योग्य वेळी नाश्ता करायला हवा.  बॅलेन्स लाईफस्टाईल अत्यंत गरजेची आहे. सकाळी ब्रेकफास्ट वेळेवर न केल्यानं शारीरिक समस्या उद्भवतात. थकवा, कमकुवतपणा दूर होतो. याऊलट रोज वेळेवर नाश्ता खाल्ल्यानं भूक नियंत्रणात राहते. वजन वाढण्याचं टेंशन नसतो. (Best Time for breakfast)

नाश्ता करण्याचं योग्य टायमिंग सकाळी ७ ते ८ मध्ये असते. जर तुम्हाला या वेळेत नाश्ता करणं शक्य नसेल तर सकाळी १० च्या आधीच नाश्ता करा. तज्ज्ञांच्यामते जरी तुम्ही उशीरा उठत असाल तरीही उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करायला हवा. कारण  रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी शरीराला उर्जेची आवश्यकता असते. सकाळी ग्लूकोजचा स्तर कमी असतो. नाश्ता केल्यानं पचनतंत्र एक्टिव्ह राहते आणि दिवसाच्या सुरूवातीला उर्जा मिळते.

नाश्त्याला फळं, पोहे, उपमा, इडली या पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीराला फायबर्स मिळतात. जे पचनक्रियेसाठी उत्तम ठरतात. ओटमिल्स, स्मूथी, टोस्ट यांचाही समावेश करू शकता. सकाळचा नाश्ता वेळेवर केल्यानं भूक कमी लागते त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंग करत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं. 

१) रात्रीपासून सकाळपर्यंतच्या अंतरात पोट रिकामे राहते आणि रिकाम्या पोटी अॅसिडिटीची तक्रार होऊ शकते. अशा स्थितीत नाश्ता केल्यानंतर पोटात जळजळ होत नाही.

२) मेंदूला निरोगी राहण्यासाठी पुरेशी ऊर्जेची गरज असते आणि नाश्ता न केल्याने मेंदूला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. अशा स्थितीत त्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परीणाम होतो. 

३) जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना डायबिटीस होण्याचा धोका सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असतो. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक आढळते. म्हणूनच नियमितपणे पौष्टिक नाश्ता करून या आजारापासून लांब राहता येते.

Web Title: What is Best Time for Breakfast : 90 percent of people do not know the right time for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.