Lokmat Sakhi >Food > चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

What is the best way to use ginger in tea for better test : what is the best way to use ginger in tea : चहात आलं किसून घालावं की कुटून असा प्रश्न पडत असेल तर त्याचेच हे उत्तर, चहात आलं घालण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 11:28 PM2024-09-12T23:28:56+5:302024-09-12T23:42:35+5:30

What is the best way to use ginger in tea for better test : what is the best way to use ginger in tea : चहात आलं किसून घालावं की कुटून असा प्रश्न पडत असेल तर त्याचेच हे उत्तर, चहात आलं घालण्याची सोपी पद्धत...

What is the best way to use ginger in tea for better test what is the best way to use ginger in tea | चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा म्हणजे स्वर्गसुख. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा तयार करण्याची रेसिपी जरी सोपी असली तरीही अचूक साहित्य वापरुन चहा बनवल्यास असा चहा एकदम फक्कड होतो. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून तो आणखीन छान लागावा यासाठी आपण चहात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालतो. चहा तयार करतांना आपण त्यात चहाचा मसाला, लवंग, आलं, दालचिनी असे अनेक पदार्थ घालतो. या पदार्थांमुळेच चहा एकदम स्वादिष्ट आणि फक्कड होतो(what is the best way to use ginger in tea).

चहा आणि आलं यांचं फार पूर्वीपासूनचे नातं आहे. कधी कंटाळा आला, अंगात आळस असेल तर झटपट फ्रेश होण्यासाठी आपण मस्त टपरीवरचा गरमागरम आलं घातलेला फक्कड चहा पितो. असा आलं घातलेला चहा प्यायल्याने अंगात तरतरीपणा येऊन फ्रेश वाटते. चहात आलं घातल्याने चहाची चव तर चांगली लागते सोबतच आल्यातील पौष्टिक गुणधर्म देखील आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात. चहा तयार करताना आपण त्यात आलं वेगवेगळ्या पद्धतीने घालतो. कधी आपण आल्याचे बारीक तुकडे करून घालतो तर कधी कुटून किंवा किसणीवर किसून देखील घालतो. परंतु यापैकी नक्की कोणत्या प्रकारे चहात आलं घातल्याने चहाची चव दुप्पट होते हे आपल्याला माहित नसते. यासाठीच चहा तयार करताना त्यात आलं कुटून घालावे की किसून ते पाहूयात(What is the best way to use ginger in tea for better test).

१. चहात आलं किसून घालण्याचे नक्की कोणते फायदे आहेत ? 

चहात आलं किसून घेतल्याने त्याचा सुगंध चहात अधिक दरवळतो. कारण आलं जेव्हा आपण किसून घालतो तेव्हा त्यातून त्याचा रस अधिक प्रमाणात बाहेर येण्यास मदत होते. त्यामुळे किसलेल्या आल्याचा स्वाद आणखीनच छान लागतो. जेव्हा आपण आलं किसून घेतो तेव्हा त्याच्या लांब, पातळ काड्या निघतात. या आल्याच्या कड्यांमध्ये भरपूर प्रमाणात आल्याचा रस असतो. या आल्याच्या पातळ स्ट्रिपमध्ये आल्याचा फ्लेवर हा अधिक जास्त प्रमाणात असतो. जर आपण हे आलं किसून डायरेक्ट चहाच्या भांड्यात घातले तर त्याचा स्वाद दुप्पट येतो. याउलट, जर आपण आलं किसून एका भांड्यात आधी काढले आणि मग चहात घातले तर त्याचा अर्धा स्वाद हा त्या भांड्याला येतो. यासाठीच चहामध्ये आलं किसून घालताना ते डायरेक्ट चहाच्या भांड्यामध्येच किसावे. 

मसाला चहा तर नेहमीचाच ! कधी पहाडी मसाला चहा प्यायलाका ? एकदा पिऊन बघा  'असा' फक्कड चहा... 

२. चहात आलं कुटून घालण्याचे नक्की कोणते फायदे आहेत ?

जर आलं सुकल असेल तर असं सुकलेल आलं आपण चहात कुटून घालतो. अशा सुकलेल्या आल्यातून जास्त प्रमाणात रस निघत नाही, त्यामुळे अस सुकं आलं चहात कुटूनच घालावे. जेव्हा आपण चहासाठी आलं खलबत्त्यात आधी कुटून मग चहात घालतो, तेव्हा आल्याचा आर्धा रस हा त्या खलबत्त्यालाच लागतो. यामुळे चहात आलं घालूंन देखील चहाला चांगली चव येत नाही. चहासाठी आलं ज्या भांड्यात कुटून घेत आहोत त्या भांड्यातच आल्याचा रस अर्धा लागतो यामुळे आल्याचा संपूर्ण स्वाद त्या चहात येत नाही. आलं जर सुकलेल असेल तर अशा सुकलेल्या आल्याची मिक्सरमध्ये वाटून बारीक पूड करुन घेतल्यास ही आल्याची पावडर देखील आपण चहात घालू शकतो. 

३. किसून घेतलेलं आणि कुटून घेतलेलं आलं यातील नेमका फरक... 

किसून घेतलेलं आलं आणि कुटून घेतलेलं आलं यात खूप मोठा फरक आहे. किसणीवर किसून घेतलेलं आलं हे थोडे पल्पी असते आणि यात जास्त प्रमाणात आल्याचा स्वाद आणि चव असते. याउलट कुटून घेतलेले आलं हे थोडे जाडसर भरड असते तसे असते तसेच याचा स्वाद जास्त प्रमाणात येत नाही. आलं कुटून घेताना आल्याचा रस हा त्या भांड्यालाच लागतो त्यामुळे कुटून घातलेल्या आल्याला तेवढी आल्याची चव लागत नाहीत. 

दूध वारंवार नासतं? त्यात मिक्स करा चिमूटभर १ खास पदार्थ, दूध नासणार नाही... 

४. आल्याची साल सोलावी की सोलू नये ?

शक्यतो आपण आल्याचा वापर करताना त्याची साल काढून मगच त्याचा वापर करतो. रिसर्चगेटच्या अभ्यासानुसार, आल्याची सालं काढणे खूप चुकीचे आहे. आल्याच्या सालीत वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळेच आल्याची सालं न काढताच वापरणे योग्य आहे. आपल्यापेक्षा आपल्याच्या सालीत दुप्पट औषधी गुणधर्म असतात यासाठीच आलं वापरताना आल्याची सालं काढू नये. यामुळे आपल्याला आल्याच्या सालीतील औषधी गुणधर्म आरोग्यास मिळतात. 

साखर- गूळ न वापरता करा बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी १० मिनिटांत हाय प्रोटीन पौष्टिक  मोदक... 

५. चहात आल्याचा वापर नेमका कसा करावा ?

चहात आलं घालताना ते नेमकं किसून घालावं की कुटून असा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी चहात आलं घालताना सगळ्यात आधी आल्याच्या वरची सालं काढू नये. आलं सालीसकट वापरावे. जर आलं सुकलेल असेल तर ते चहात घालताना कुटून घालावे, आणि जर आलं फ्रेश असेल तर असं आलं किसणीवर किसून चहात घालावे.

Web Title: What is the best way to use ginger in tea for better test what is the best way to use ginger in tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न