कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च हे दोन्ही पदार्थ मक्याचेच आहेत. या दोन्ही पदार्थांमध्ये फार काही फरक असतो असं बऱ्याच जणींना वाटत नाही. पण प्रत्यक्षात मात्र कॉर्न फ्लाेअर आणि कॉर्न स्टार्च हे दोन्ही खूप वेगवेगळे पदार्थ आहेत. आणि दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या रेसिपी करण्यासाठी वापरतात. चायनिज पदार्थ करण्यासाठी कॉर्न स्टार्च वापरलं जातं. पण बहुतांश जणी त्याला कॉर्न फ्लोअर असं म्हणतात. म्हणूनच आता कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च यात नेमका फरक काय आणि कोणता पदार्थ कशासाठी वापरायचा ते पाहूया (difference between corn flour and corn starch in Marathi)....
कॉर्न फ्लोअर म्हणजे काय?
कॉर्न फ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ. आपण गहू, बाजरी, ज्वारी ज्या पद्धतीने दळून आणतो, तशाच पद्धतीने मका दळून आणल्या जातो. त्याला कॉर्न फ्लोअर असं म्हणतात. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. ते पिवळ्या रंगाचं असतं आणि भाकरी, वडे, भजे करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
कॉर्न स्टार्च म्हणजे काय?
कॉर्न स्टार्च हा स्टार्चचा एक प्रकार आहे. बरीच रासायनिक प्रक्रिया करून कॉर्न स्टार्च तयार केलं जातं.
वेगवेगळ्या वर्षांमध्ये जन्मली जुळी भावंड, बघा या भावंडांची मजेशीर व्हायरल गोष्ट....
कॉर्न स्टार्च तयार करण्यासाठी मक्याच्या दाण्यांची टरफलं काढून टाकली जातात आणि त्यावर प्रक्रिया करून त्याचं स्टार्च तयार केलं जातं. ते अगदी शुभ्र चमकदार पांढऱ्या रंगाचं असतं. कॉर्न स्टार्चचा वापर चायनिज पदार्थांमध्ये होतो. सूप किंवा ग्रेव्हीला घट्टपणा आणण्यासाठी किंवा पदार्थांना क्रिस्पी करण्यासाठी कॉर्न स्टार्च वापरतात.