"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" अशी म्हणं आपल्याकडे अतिशय लोकप्रिय आहे. कोणत्या ना कोणत्या पदार्थात आपण तूप घालून खातोच. मोदक, खिचडी, पुरणपोळी असे काही ठराविक पदार्थ म्हटले की त्यासोबत तूप लागतेच. मूळात तूप (Ghee) हे फॅटसचे बनलेले असते. त्यामध्ये कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिंडंटसही असतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच तूपात २५ टक्के ट्रायग्लिसराईडस असतात आणि इतर ७५ टक्के सॅच्युरेटेड फॅटस असतात. हे सगळे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे घटक शरीरात शोषले गेल्याने आपली ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. पण काहीजण आवडतं म्हणून खूप जास्त प्रमाणात तूप खातात तर काही जण अजिबातच तूप खात नाहीत, हे दोन्हीही आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषण तूपातून होत असते पण त्यासाठी योग्य त्या प्रमाणात व योग्य पद्धतीने तूप खायला हवे.
'तूप' हा आपल्या रोजच्या जेवणाचा मुख्य भाग आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे साजूक तूप ताकद वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी खाल्ले जाते. तूप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने दिवसातून १ ते २ चमचे तूप आहारात अवश्य असायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. कारण पचनशक्ती सुधारण्यासाठी, त्वचा, केस चांगले होण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी तूप अतिशय फायदेशीर असते. हाडांमधील वंगण म्हणूनही तूपाचा फायदा होतो. हे सगळे खरे असले तरी तूप खाताना काही गोष्टींची (How to take ghee) काळजी घेणे गरजेचे असते. तूप खाताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात(What is the healthiest way to consume ghee ?).
तूप खाताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
नियम १ :- तूप खाताना ते नेहमी कोणत्या तरी गरम पदार्थांसोबतच खावे.
तूप खाताना ते नेहमी कोणत्यातरी गरम पदार्थांसोबतच खाणे योग्य आहे. गरम वरण - भात, खिचडी किंवा यांसारखे पदार्थ बनवल्यानंतर ते पदार्थ गरम असतानाच त्यावर तूप घालूंन खावे. तूप गरम पदार्थांसोबतच खाल्ल्याने ते आपल्या अन्ननलिकेत चिकटून न बसता व्यवस्थित पोटांत जाते. याचबरोबर गरम पदार्थांसोबत तूप खाल्ल्याने, तूप पचनास अधिक मदत होते. यामुळे तूप खाताना ते कायम गरम पदार्थांसोबत किंवा गरम पाण्यांत मिसळून खाणे अतिशय योग्य ठरेल.
नियम २ :- मध आणि तूप एकत्रित करुन खाणे टाळा.
मध आणि तूप यांना एकत्रित करुन खाणे टाळावे, याचबरोबर मध आणि तूप एकत्रित असणारे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. तूप आणि मध हे विसंगत पदार्थ आहेत त्यामुळे तूप आणि मध एकत्रित करुन खाणे टाळावे.
एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...
नियम ३ :- दुपारच्या जेवणासोबत तूप खाणे हीच तूप खाण्याची योग्य वेळ आहे, असे मानले जाते.
तूप खाताना ते आवडत म्हणून भरपूर प्रमाणांत खाणे योग्य नाही. याचबरोबर दिवसाच्या कोणत्याही वेळी तूप खाणे ही योग्य पद्धत नाही. तूप खाताना ते प्रत्येक दिवशी योग्य त्या प्रमाणातच खावे. रोज जास्त तूप किंवा तुपाचे पदार्थ खाणं चुकीचं ठरतं. कारण हे एक हाय कॅलरी फूड आहे. दिवसभरात १ ते २ चमचे तूप प्रत्येक व्यक्तीने खायला हवे. तूप खाताना शक्यतो ते दुपारच्या जेवणासोबतच खाणे योग्य आहे. दुपारच्या जेवणासोबत जेवण गरम असताना त्यावर तूप सोडून, जेवणाचा पहिला घास घेताना सर्वप्रथम तूप खाल्ले जाईल असे बघावे. जेवणाच्या पहिल्या घासासोबत तूप खाल्ल्याने आपल्या पोटातील अग्नी हा व्यवस्थित प्रज्वलित होऊन अन्न व तूप हे दोन्ही चांगल्या पद्धतीने पचवले जाते.