ब्रेकफास्ट म्हणजे आपला दिवसातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आहार. हा आहार चांगला, पोटभरीचा आणि शरीराचे पोषण करणारा असेल तर आपले आरोग्य उत्तम राहायला मदत होते. पण सकाळी उठल्यावर ब्रेकफास्टमध्ये काय करावं? असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सकाळी काय खायला हवं असा प्रश्न अनेकांना असतो. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी घेणारेही अनेक जण असतात. पण हे योग्य आहे का? ब्रेकफास्टमध्य पोहे, उपीट, तळलेले वडे असे पदार्थ खाल्ल्याने खरंच शरीराचे पोषण होते का? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याची नेमकी उत्तरे आपल्याला मिळतातच असे नाही (What Is The Ideal Breakfast Diet Tips by Anjali Mukherji).
यासाठीच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आहाराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. इन्स्टाग्रामवर अंजली मुखर्जी चांगल्याच अॅक्टीव्ह असून आपल्या फॉलोअर्सना त्या आहार आणि आरोग्य या विषयातील काही ना काही टिप्स सातत्याने देत असतात. त्यांच्या या टिप्सना नेटीझन्सचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रियाही येतात. ब्रेकफास्टमधून आपल्या शरीराचे पोषण तर व्हायलाच हवेच, पण दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठीही ब्रेकफास्ट चांगला असणे आवश्यक आहे. पाहूया आदर्श ब्रेकफास्ट काय असावा याविषयी अंजली मुखर्जी काय टिप्स देतात...
१. दिवसाची सुरुवात फळ खाऊन करा.
२. फळ खाल्ल्यानंतर तासाभराने तुम्हाला परत भूक लागली तर १ किंवा २ अंडी खा. यासोबत एखादा टोस्ट आणि १ ग्लास गाजराचा, बीटाचा किंवा टोमॅटोचा ज्यूस घेऊ शकता.
३. जे लोक अंडी खात नाहीत त्यांनी १०० ग्रॅम पनीर तव्यावर गरम करुन खावे. याऐवजी पनीर पराठा, पनीर बुरजी आणि ग्लासभर गाजराचा, बीटाचा किंवा टोमॅटोचा ज्यूस घ्यायला हवा.
फळातून जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. अंडी किंवा पनीर यांतून शरीराची प्रथिनांची गरज भागवली जाते. आणि भाज्यांच्या ज्यूसमुळे शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये काय असावे असा प्रश्न तुम्हाला वारंवरा पडत असले तर झटपट होणारे हे सोपे उपाय आहेत हे लक्षात घ्यायला हवे.