सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून पोषक तत्वांनी समृद्ध आहे. आहारात याचा समावेश केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सफरचंदात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, आयर्न, व्हिटॅमिन ई, नियासिन, व्हिटॅमिन डी, फायबर, कॅल्शियम आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहेत. म्हणूनच दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, सफरचंद खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? कोणत्या वेळी सफरचंद खाणं सर्वात फायदेशीर ते जाणून घेऊया...
सफरचंदाचे फायदे
पौष्टिकतेने समृद्ध असलेलं सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे पचनक्रियेला मदत करतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं. तसेच, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम समृद्ध असल्याने, सफरचंद हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सफरचंदात कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. हे वजन कमी करण्यास मदत करतं. सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
सफरचंद खाण्याची सर्वोत्तम वेळ
सकाळी उपाशी पोटी
सकाळी उपाशी पोटी सफरचंद खाणं ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वेगाने होतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच सफरचंदात असलेलं फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचन सुधारण्यास मदत करतात. सफरचंद हे नॅचरल शुगरसारखं काम करतं, म्हणून सकाळी ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. सफरचंदात असलेलं पेक्टिन नावाचं फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
जेवणाच्या आधी १-२ तास किंवा नंतर
तुम्ही जेवणाच्या १-२ तास आधी किंवा नंतर सफरचंद खाऊ शकता. जेवणापूर्वी किंवा नंतर सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच सफरचंदात भरपूर पाणी असतं, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.
संध्याकाळी हलका नाश्ता
संध्याकाळी हलका नाश्ता म्हणूनही सफरचंद खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रात्री चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच सफरचंद खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहतं, ज्यामुळे जेवणाच्या वेळी जास्त भूक लागत नाही.