Lokmat Sakhi >Food > What Is The Science Behind Cooking Rice : भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे

What Is The Science Behind Cooking Rice : भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे

What Is The Science Behind Cooking Rice : तांदूळ शिजवण्यासाठी प्री-बॉइलिंग (पीबीए) चा अवलंब करणे आणि आर्सेनिक काढून टाकण्यासाठी भात शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळणे चांगले. यानंतर पुन्हा पाणी घालून मंद आचेवर भात शिजवावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:07 PM2022-05-17T16:07:49+5:302022-05-17T16:12:01+5:30

What Is The Science Behind Cooking Rice : तांदूळ शिजवण्यासाठी प्री-बॉइलिंग (पीबीए) चा अवलंब करणे आणि आर्सेनिक काढून टाकण्यासाठी भात शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळणे चांगले. यानंतर पुन्हा पाणी घालून मंद आचेवर भात शिजवावा.

What Is The Science Behind Cooking Rice : Scientific method of cooking rice | What Is The Science Behind Cooking Rice : भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे

What Is The Science Behind Cooking Rice : भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे

तांदूळ खाण्याच्या आणि शिजवण्याच्या आरोग्यदायी पद्धतींवर बर्‍याच काळापासून चर्चा होत आहे. (Cooking rice) विशेषत: मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा नेहमीच मोठा आरोग्याचा प्रश्न राहिला आहे. संशोधक आणि तज्ञ नेहमीच हे शोधत असतात की निरोगी पद्धतीने भात शिजवण्याचा कोणता मार्ग सर्वात आरोग्यदायी आहे. (Scientific method of cooking rice)

तांदूळ शिजवण्याच्या आरोग्यदायी पद्धतीबद्दल अलीकडील संशोधन सांगतो. 'सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार पांढऱ्या तांदूळ आणि तपकिरी तांदळात आर्सेनिकसारखे घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात. (Cooking Tips) हे आर्सेनिक घटक काढून टाकण्याचा एक आरोग्यदायी मार्ग म्हणजे भात शिजवण्यासाठी 'परबॉइलिंग विथ ऍब्सॉर्प्शन' पद्धतीचा ' (Parboiling With Absorption Method)  अवलंब करणे. (10 Tips to Help You Cook Faster) वापर करणे.

सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात भात शिजवण्याच्या आरोग्यदायी पद्धतीचे वर्णन केले आहे. तांदूळ शिजवण्याच्या या पद्धतीला 'परबॉइलिंग विथ ऍब्सॉर्प्शन मेथड' (arsenic) असे म्हणतात. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही भात शिजवण्याची ही पद्धत अवलंबली तर तुम्ही ब्राऊन राइसमधून 50 टक्के आर्सेनिक काढून टाकू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही पांढऱ्या तांदळातून 74 टक्के आर्सेनिक काढून टाकू शकता. (What are some tips for cooking very quickly)

तृणधान्यांपेक्षा या तांदळात सुमारे दहापट जास्त आर्सेनिक जमा होते. तांदळाच्या दाण्यातील आर्सेनिक एंडोस्पर्मच्या सभोवतालच्या बाहेरील थरावर जमा होते. याचा अर्थ असा की जर तुम्ही तांदूळ नियमित शिजवलात तर ब्राऊन तांदूळ किंवा पांढरा तांदूळ, दोन्हीमध्ये आर्सेनिक राहते. मिलिंग प्रक्रियेमुळे पांढऱ्या तांदळातून आर्सेनिक काढून टाकले जात असले तरी ते ७५-९०% पोषक घटक देखील काढून टाकते. (5 tips to help you cook faster in kitchen)

हे लक्षात घेण्यासारखे आहे की इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने आर्सेनिकला गट 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे. हे पाण्यात विरघळणारे असते, त्यामुळे ते भातामध्ये साचते आणि खाल्ल्यानंतर शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे त्याच्या संपर्कामुळे शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवावर परिणाम होतो आणि या सर्व अवयवांशी संबंधित आजार होतात. - त्वचेच्या समस्या, कर्करोग, मधुमेह, फुफ्फुसाचा आजार

PBA पद्धतीनं कसा शिजवाल तांदूळ?

जेव्हा शेफिल्ड विद्यापीठाने भात शिजवण्यासाठी ही पद्धत शोधून काढली तेव्हा तांदळातील आर्सेनिक सामग्री कमी करण्याच्या विविध पद्धती तपासल्या गेल्या. दरम्यान, इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल फूडच्या टीमला असे आढळून आले की, भात शिजवण्याच्या घरगुती पद्धतीचा वापर करून भाताचे पोषणही नष्ट होत आहे. त्यामुळे तांदूळ शिजवण्यासाठी प्री-बॉइलिंग (पीबीए) चा अवलंब करणे आणि आर्सेनिक काढून टाकण्यासाठी भात शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळणे चांगले. यानंतर पुन्हा पाणी घालून मंद आचेवर भात शिजवावा.

कोणं म्हणतं रात्री भात खाल्ल्यानं तब्येत वाढते? रात्रीच्यावेळी भात खाल्ल्यानं शरीराला मिळतात ५ फायदे

यामध्ये तुम्ही तांदूळ फक्त ५ मिनिटे उकळू शकता आणि हानिकारक घटक काढून टाकू शकता. जेव्हा तुम्ही या पद्धतीने भात शिजवता, तेव्हा तुम्ही तांदळातील अधिकाधिक पोषक द्रव्ये टिकवून ठेवू शकता, जे तुमच्या सामान्य भात बनवण्याच्या पद्धतीमध्ये उपलब्ध नाही. पीबीए पद्धतीने भात शिजवल्याने भाताचे सूक्ष्म पोषक घटक टिकून राहतील. ही पद्धत सोपी आहे आणि याला खूप कमी वेळ लागतो.

अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरून जाण्याआधी ४ गोष्टी करा; तब्येत सांभाळण्याचे सोपे उपाय

या ५ फायद्यांव्यतिरिक्त लहान मुले, मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांना या पद्धतीने भात शिजवण्याचा सर्वाधिक फायदा होईल. कारण आर्सेनिकचे उच्च प्रमाण लहान मुलांचे नुकसान करू शकते. तसेच, या पद्धतीमुळे तांदळातील स्टार्चचे प्रमाण कमी होईल. जे मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त लोकांसाठी योग्य नाही. 

Web Title: What Is The Science Behind Cooking Rice : Scientific method of cooking rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.